आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटीत युवकाचा डेंग्यूने मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटी परिसरात एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे सोमवारी सकाळी उघड झाले. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केवळ पाहणी करण्यात समाधान मानले आहे. साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ओमनगरमधील वालझाडे मंगल कार्यालयाजवळ राहणारा आप्पासाहेब सुभाष साळुंखे (वय 22) याचा डेंग्यूने मृत्यू झाला. इस्तरीचे काम करून तो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. प्रभाग 10 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करूनदेखील आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने तरुणास जीव गमवावा लागला, असा आरोप नगरसेवक समाधान जाधव यांनी केला आहे. आरोग्य विभाग परिसरात स्वच्छतेचा केवळ देखावा करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरासह परिसरात अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारात वाढ होत असून नागरीकांकडून वारंवार स्वच्छतेची मागणी करण्यात येत आहे. शिवसेनेतर्फेही स्वच्छतेची मोहिम शहरात राबविण्यात आली. तसेच कचरा फेक आंदोलन करण्यात आले होते. मात्र, स्थिती जैसे थेच आहे.