आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसदृश आजाराचे शहरात चाळीस रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रसार होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, शहरात सध्या डेंग्यूसदृश आजाराचे 40 ते 50 रुग्ण आहेत. या आकडेवारीत शहरातील खासगी रुग्णालयांतील रुग्णांचा समावेश नाही. अशा रुग्णांची कोणतीच माहिती महापालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

जुन्या नाशकातील बागवान भागात शुक्रवारी एक डेंग्यूचा रुग्ण आढळला. काही दिवसांपूर्वीच पंचशीलनगर येथे डेंग्यूने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने या परिसरात दोन दिवस स्वच्छता मोहीम राबवली. मात्र, नंतर तेथे स्थिती ‘जैसे थे’च आहे. पालिका अधिकार्‍यांना खासगी रुग्णालयामधील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी माहीत नाही. याबाबत विचारणा केली असता अधिकारी सांगतात की, खासगी रुग्णालयांना याबाबतची आकडेवारी देण्याचे आदेश दिले आहेत, तर खासगी रुग्णालयाकडे विचारणा केली असता त्यांनी असा आदेश मिळाला नसल्याचे म्हटले.