आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूर फवारणीसाठी १२ यंत्रे, महापौरांसह स्थानिक नगरसेवकही लावणार फवारणीवेळी हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दीडमहिन्यात डेंग्यूच्या रुग्णांनी शहरात शंभरी ओलांडल्यानंतर जाग्या झालेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाची झाडाझडती घेत महापौरांनी गुरुवारी (दि. १३) सायंकाळपासूनच शहरात १२ यंत्रे कार्यरत करून डास प्रतिबंधक धूर फवारणी सुरू करण्याचे आदेश दिले. या फवारणी मोहिमेची सुरुवात जेथे डेंग्यूबाधित रुग्ण आढळले त्यांच्या घरापासून केली जाणार आहे.सुरुवातीला कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी महापौरांसह स्थानिक नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत डेंग्यूने शहरात यंदा चांगलाच धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे डेंग्यूची संख्या वाढत असताना आरोग्य विभाग मात्र मख्ख होता. दिवाळीमध्ये शहरात कचऱ्याचे ढीग साचले असताना घंटागाडी कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन केले. ते आंदोलन मिटवून कचरा उचलण्यासाठी महापौर उपमहापौरांना बैठक घ्यावी लागली. दरम्यान, चार दिवसांपासून डेंग्यूविरोधात राजकीय सामाजिक संघटनांनी आंदोलन करून आरा ेग्य विभागावर ताशेरे ओढले. आरोग्य विभागाकडून धूर फवारणीच बंद असून, २० यंत्रांपैकी चारच कार्यरत असल्याचे पुढे आले. या पार्श्वभूमीवर महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने, जीवशास्त्रज्ञ वैशाली पाटील यांची बैठक बोलावली. त्यात धूर फवारणीची चारच यंत्रे सुरू असल्याचे फवारणीसाठी चारच कर्मचारीही उपलब्ध असल्याचे लक्षात आल्याने महापौरांनी कर्मचारी वाढवण्यासाठी आता कोणी प्रयत्न करायचे, असा सवाल केला. दरम्यान, महिनाभरात संपूर्ण शहरात धूर फवारणीची किमान एक फेरी पूर्ण झाली पाहिजे, अशी तंबी देत त्यासाठी किमान १५ यंत्रे सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्‍या.मात्र, आरोग्याधिकाऱ्यांनी १२ यंत्रे सुरू करतो, असे सांगितले. डेंग्यूबाधित रुग्ण सापडले तेथे प्रथम फवारणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

स्वत: हजेरी लावणार
धूरफवारणीबाबत तक्रारी असल्यामुळे आता त्यावर स्वत: लक्ष ठेवणार आहे. १५ धूर फवारणी यंत्रे कार्यान्वित करण्याचे आदेश दिले असून, आरोग्य विभागाने १२ यंत्रांद्वारे फवारणी करण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी कर्मचारीही वाढवले जाणार आहेत. सुरुवातीला स्वत: हजेरी लावून या मोहिमेकडे लक्ष ठेवणार आहे.

सायंकाळी फवारणी
सायंकाळीते वाजेदरम्यान डासांची संख्या वाढत असल्यामुळे या काळात धूर फवारणीचे आदेश महापौरांनी दिले. या वेळी स्थानिक नागरिक नगरसेवकांनाही बोलावून घेण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेथे गरज आहे, अशाच भागात फवारणी करा, असेही त्यांनी सांगितले.