आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूची भीती पसरविण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- डेंग्यूच्यासंशयित रुग्णाची खातरजमा करण्यासाठी केवळ िजल्हा शासकीय रुग्णालयाची प्रयाेगशाळा हीच एकमात्र अधिकृत व्यवस्था असताना, काही खासगी रुग्णालयांकडून परस्पर ‘एनएस १’च्या रुग्णाला डेंग्यूचे संशयित म्हणून उपचार करण्याचे प्रकार सुरू झाल्याची बाब महापालिकेच्या अाराेग्य विभागाच्या निदर्शनास अाली अाहे. सीबीएस परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये असाच प्रकार घडल्याची शहानिशा झाल्यानंतर अाता अाराेग्य विभागाने साथराेग नियंत्रण यंत्रणा अर्थातच अायडीएसपी सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. तसेच, सिव्हिलमधील प्रयाेगशाळेतून जाेपर्यंत डेंग्यूचा रुग्ण संशयित वा बाधित याबाबत स्पष्ट अहवाल येत नाही ताेपर्यंत परस्पर काेणी रुग्णाची माहिती जाहीर करू नये, अशीही ताकीद देण्याचे अादेश महापाैर अशाेक मुर्तडक यांनी िदले अाहेत.
गेल्या वर्षी नाेव्हेंबरमध्ये शहरात डेंग्यूची माेठी साथ अाली हाेती. मनसे नगरसेविकेच्या पतीच्या मृत्यूबराेबरच अनेकांचा डेंग्यूमुळे बळी गेल्याचे उघड झाले हाेते, तर डेंग्यूची लागण झालेले संशयित रुग्णांची संख्या हजारापर्यंत पाेहोचली हाेती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अाराेग्य विभागाचीही चांगलीच बदनामी झाली हाेती. दरम्यान, या बदनामीला खासगी रुग्णालयातील चुकीच्या रिपाेर्टिंगमुळे हातभार लागल्याचा अाराेग्य विभागातील अधिकाऱ्यांचा खासगीत दावा असून, त्याला लगाम घालण्यासाठी अाता परस्पर डेंग्यूचा संशयित रुग्णही जाहीर करण्यास बंदी करण्यात अाली अाहे. नुकत्याच एका खासगी रुग्णालयात ‘एनएस १’ या अाजाराच्या रुग्णाला डेंग्यू झाल्याचे जाहीर करून उपचार केल्याची तक्रार अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांच्याकडे अाली हाेती. प्रत्यक्षात संबंधित रुग्णाला डेंग्यू नसल्याचे उघड झाल्यामुळे वेळीच पावले उचलण्याप्रत अाराेग्य विभाग अाला अाहे.

चूक वैद्यकीय विभागाची, खापर मात्र अाराेग्य विभागावर
चूकवैद्यकीय विभागाची असताना खापर मात्र अाराेग्य विभागावर फुटते, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. वास्तविक घराेघरी जाऊन ताप साथराेग रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची जबाबदारी वैद्यकीय विभागाची अाहे. प्रत्यक्षात असे हाेते की नाही, याविषयी संशयच अाहे. या पार्श्वभूमीवर अाराेग्य विभागाची यंत्रणाही घराेघरी जाऊन सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले.