आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Departmental Officials Enclosures Civilians Suffer

विभागीय अधिकाऱ्यांना त्रस्त नागरिकांचा घेराव, आंदोलनाद्वारे प्रशासनाचा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जुन्याना शकातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले असून, समस्यांचे निवारण होण्यासाठी नागरिकांसह साईसेवक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मंगळवारी (दि. १७) महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
तत्पूर्वी विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांना त्यांच्याच दालनात घेराव घालून ठिय्या आंदोलन करीत जोपर्यंत समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता.

मेनरोड परिसरातील महापालिकेच्या पूर्व विभागात मंगळवारी साईसेवक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश राऊत यांच्यासह शेकडो नागरिकांनी धाव घेऊन जुन्या नाशकातील समस्यांबाबत पूर्व विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांना घेराव घातला. विभागीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याचा आरोप करत त्यांंच्या दालनातच ठिय्या आंदोलनही करण्यात आले. साईसेवक मित्रमंडळातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुने नाशिक भागातील जागोजागी साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नागरी आरोग्याच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या मोहिमांकडे पूर्व विभागाकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झाल्याने जुन्या नाशकातील खडकाळी परिसरातील जीन मंझीलच्या मागे, त्र्यंबक पोलिस चौकीच्या मागे या दोन्ही परिसरासह अनेक भागात डास, माशांच्या प्रमाणात वाढ झाली अाहे. परिणामी, संसर्गजन्य आजाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. अनेक भागातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. तसेच, जुने नाशिक परिसरातील नानावली, कथडा, बुधवार पेठ, काझीगढी, बागवानपुरा यांसह काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत यांसह विविध समस्यांबाबत विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी गुड्डू शेख, सतीश बोढरे, चैतन्य राजुदे, इमरान खान, गणेश पवार, मुरली नाईक, गणेश शाहू, कुणाल चोड, स्वप्नील साेनवणे, रोहित राजदूत आदी उपस्थित होते.

तक्रार करूनही दुर्लक्ष
प्रभाग२६ मधील खडकाळी परिसरात डासांसह माशांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या संदर्भात आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना निवेदने देऊनदेखील त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रारी नागरिकांनी केली आहे.

..तर ‘कचरा फेको’ आंदोलन
जुन्यानाशकात काही दिवसांपासून अस्वच्छता इतर समस्यांत वाढ झाली आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या समस्या त्वरित सुटल्या नाहीत तर आयुक्तांच्या दालनात ‘कचरा फेको’ आंदोलन करण्यात येईल. अंकुशराऊत, अध्यक्ष, साईसेवक मित्रमंडळ