आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवीदारांचे पैसे परताव्याचा २० दिवसांत देणार आराखडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशभरातील हजाराे ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी अटक करण्यात अालेल्या ‘मैत्रेय’च्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अखेर विशेष सत्र न्यायालयाने २० दिवसांच्या मुदतीवर तात्पुरता सशर्त जामीन मंजूर केला अाहे. त्याचबराेबर न्यायालय अादेशानुसार पाेलिस तपासात अातापर्यंत प्राप्त तक्रारींनुसार काेटी ४७ लाखांच्या फसवणुकीच्या रकमेपैकी ७४ लाख रुपये जामिनापूर्वी उर्वरित ७४ लाख २० दिवसांच्या अात भरण्याची तयारी सत्पाळकर यांच्याकडून दर्शविण्यात अाली. तसेच, याच कालावधीत मैत्रेयच्या देशभरातील ठेवीदारांच्या पैशांचा परतावा कसा करणार, याचा सविस्तर अाराखडाही न्यायालयाला सादर करावा लागणार अाहे.

ठेवींच्या माेबदल्यात प्लाॅट नावावर करून देण्याचे अामिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी सत्पाळकर यांना अटक करण्यात अाली होती. न्यायालयाने सुरुवातीला चौदा दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. या कालावधीत सरकारवाड्याचे वरिष्ठ निरीक्षक तपासी अधिकारी डाॅ. सीताराम काेल्हे यांनी मैत्रेयच्या वेगवेगळ्या ११ कंपन्यांसह त्यांची काेट्यवधींची उलाढाल, राज्यभरातील मिळकतींचा तपशील जमा केला. तसेच ठेवींच्या मुदत पूर्ण हाेऊनही पैसे परत मिळालेल्या ६७१ ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. तपासात सुमारे काेटी ४५ लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, मैत्रेयशी संलग्न सर्वच कंपन्यांमध्ये जनार्दन परूळेकर सत्पाळकर हे दाेघेच संचालक अाढळून अाले अाहे. त्यानुसार परूळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल अाहे, ताे अद्याप फरार असून पाेलिस पथके रिकाम्या हाताने परतले अाहेत.
दरम्यान, सत्पाळकर यांची गेल्या १३ दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात अाली हाेती. पाेलिसांनी कंपनीचे सर्व्हर, हार्डडिस्क जप्त करून घेतल्याने कंपनीचे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे तपासातही फारसे काही हाती लागत नव्हते.

चार दिवसांच्या युक्तिवादानंतर निर्णय : सत्पाळकर यांच्या जामिनाचा अर्ज विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एच. माेरे यांच्यासमाेर दाखल झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुनावणी सुरू हेाती. सत्पाळकर यांच्या वतीने अॅड. जयदीप वैशंपायन अाणि अॅड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडताना कंपनी १९९८ पासून कार्यरत असताना गाेरगरीब, कष्टकरी अाणि ग्रामीण भागात कंपनीने ठेवी स्वीकारतानाच वेगवेगळ्या माध्यमातून राेजगार निर्मितीचे प्रकल्प उभे केले. समाजहित डाेळ्यासमाेर ठेवल्याने गुंतवणूकदारांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच गेली.

काही तांत्रिक बाबींमुळे ठेवीदारांचे धनादेश वटले नसले तरी अटकेनंतरही दाेन दिवस ठेवी परत दिल्याचे कागदपत्रे न्यायालयात सादर केले. जामीन दिल्यास तक्रारदारांचे पैसे तातडीने परत करण्याची तयारी दर्शविली. उर्वरित गुंतवणूकदारांनाही त्यांच्या मुदतीप्रमाणे पैसे परत देण्यासाठी इतर मिळकतींची विक्री केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र देण्याची संमती अॅड. कासलीवाल अॅड. वैशंपायन यांनी मागितली. तर सरकारी वकील राजेंद्र घुमरे पंकज चंद्रकाेर यांनी त्यास अाक्षेप घेत ठेवीदारांचे हित लक्षात घेता सर्वाेच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुब्रताे राॅय खटल्याचा संदर्भ दिला. सेबीच्या अादेशानुसार ८०० काेटींचा हा घाेटाळा असून, ही रक्कम किती दिवसांत जमा करणार अाणि ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार याचा अाराखडा सादर करण्याची मागणी केली. त्याचबराेबर सत्पाळकर यांना जामीन मंजूर केल्यास त्या परदेशात पळून जाण्याची भीती व्यक्त केली.

त्यासाठी त्यांचा पासपाेर्ट जप्त करून त्यांना महाराष्ट्राबाहेर जाऊ देऊ नये अशा अटी घालण्यात याव्यात, अशीही मागणी केली. अखेर न्यायालयाने पाेलिस, सरकारी वकील अाणि अाराेपींचे वकील यांच्या बाजू समजूत घेत २० दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर करण्याचे अादेश दिले.

गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची अपेक्षा
सामान्य ठेवीदारांना त्यांच्या कष्टाचा पैसा कसा मिळवून देता येईल, यासाठी न्यायालयासमाेर केबीसी, इमू सुब्रताे राॅय प्रकरणाचे संदर्भ देण्यात अाले. त्याचअाधारे न्यायालयाने हा सशर्त जामीन मंजूर केला. ठेवीदारांचे पैसे तेही अल्पकाळात परत मिळवून देण्यात सरकारी पक्ष यशस्वी हाेणार अाहे. अॅड. पंकज चंद्रकाेर, सरकारी वकील

काेर्टाने दिलेल्या मुदतीत अाराखडा सादर करणार
न्यायालयाने घालून दिलेल्या पाचही अटींचे मुदतीत पालन केले जाणार असून, ठेवीदारांचा एकही पैसा बुडणार नाही, याची हमी सत्पाळकर यांनी दिली असून, तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अाले आहे. एक लाखाचा जामीन देण्यात अाला असून, २० दिवसांत देशभरातील ठेवीदारांच्या रकमेचा परतावा कसा करणार, याबाबतचा अाराखडा सादर केला जाईल. अॅड. वैशंपायन, अॅड.कासलीवाल