आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास आराखडा म्हणजे गोड आवरणात कडू गोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विकास आराखड्यात छुप्या पद्धतीने मोठे आरक्षण टाकण्यात आले असून, ते सर्व आरक्षण शेतकऱ्यांच्या जिवावर घेतले जाणार आहे. गृहनिर्माणसाठी तब्बल १२ हजार चौ.कि.मी. क्षेत्र खुले करून बिल्डरांची सोय पाहण्यात आली आहे. आराखड्यासाठी तब्बल ३० हजार कोटी इतका प्रचंड पैसा लागणार असून, तो उभारणे अशक्य असल्याने हा आराखडा म्हणजे गोड आवरणातील कडू गोळी असल्याचे प्रतिपादन उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी केले.
मात्र, वसंत व्याख्यानमालेतील अन्य तीन वक्त्यांनी हा विकास आराखडा मागील प्रारूप आराखड्याच्या तुलनेत चांगला असल्याचे सांगितले. यशवंतराव महाराज पटांगणावर वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते.
बग्गा यांनी या आराखड्यातील काही मूलभूत संकल्पनाच चुकीच्या गृहीत धरून त्यावर हा आराखडा तयार करण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवला. नाशिक महानगराचे क्षेत्र मागील विकास आराखड्यात २५९ चौ. कि.मी.वरून यंदा २६७ चौ.कि.मी. कसे काय झाले? तसेच गत आराखड्यातील विकास क्षेत्रापैकी दोन हजार हेक्टर शिल्लक असतानाही नवीन आराखड्यात हे क्षेत्र हजार चौ.कि.मी.वरून थेट १२ हजारांवर नेण्यात आल्याने बिल्डरांची चांदी होणार असल्याचेही बग्गा यांनी नमूद केले. सामान्य शेतकरी त्याच्या ले-आऊटमध्ये आरक्षण टाकायला गेल्यास त्याची ५५ टक्के जागा विविध आरक्षणात आणि नियमानुसार जागा सोडण्यातच जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेडीरेकनरच्या दरानुसार या आराखड्याची किंमत ३० हजार कोटींपर्यंत जात असल्याने ते अव्यवहार्य आहे. हे शहर हिरवं राहायला हवे असेल तर त्यातील रहिवासी क्षेत्राला अशी अवास्तव जागा देऊन चालणार नाही, असेही बग्गा यांनी नमूद केले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, आराखड्याची अंमलबजावणी अवघड...
बातम्या आणखी आहेत...