आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Design Development To Look Out For One Year Term

विकास आराखड्यासाठी वर्षभराची मुदत मिळावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड-मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळावा शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करून नवीन शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी वर्षभराची व चुकीच्या नियोजनामुळे तयार झालेला आराखडा रद्द करावा, तसेच नवीन अधिकारी नियुक्त करून आराखडा तयार केला जावा, कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फ करावे, खर्च वसूल करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक दामोदर मानकर यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी नगररचना विभागाचे विभागीय सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले. लष्कर, मध्यवर्ती कारागृह, प्रेस हद्दबाबत नियमाचे पालन न करता या क्षेत्राचा रहिवासी विभागात समावेश केला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक, बिल्डर यांचा फायदा करून देण्यात आल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
जनतेची फसवणूक
आराखडा रद्द केल्याचे सांगून शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. पूर्वीच्या आराखड्यात नागरिकांच्या सूचनांनुसार दुरुस्ती होईल. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर वेळकाढूपणा केला जात आहे. विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
.तर आंदोलन
विकास आराखडयात शेतकर्‍यांच्या जमिनीवर चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणाबाबत लेखी सूचना दिल्या आहेत. त्याबाबत आमचे योग्य समाधान झाले नाही, तर शिवसेना स्टाइल आंदोलन केले जाईल. अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना
शिवसेना शिष्टमंडळाची राज्य शासनाकडे मागणी