आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिटरेचर फेस्‍टीव्‍हल: काव्‍य वाचनाने कार्यक्रमांना सुरुवात, असे आहे आजचे आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्‍टीव्‍हलमध्‍ये आज देवदत्‍त पटनायक आणि \'कबिर कॅफे\' प्रमुख आकर्षण आहेत. - Divya Marathi
फेस्‍टीव्‍हलमध्‍ये आज देवदत्‍त पटनायक आणि \'कबिर कॅफे\' प्रमुख आकर्षण आहेत.
नाशिक- दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रविवारी  (दि. ५) जय महाभारत या ग्रंथाचे लेखक देवदत्त पटनायक यांच्याशी लेखक अभय सदावर्ते संवाद साधतील. अाजच्या कार्यक्रमाचे ते प्रमुख अाकर्षण अाहेत. दरम्यान, ज्येष्ठ रंगकर्मी गणेश मतकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टिव्हलचा समारोप होणार आहे. नाटककार विवेक गरुड यावेळी मतकरींशी संवाद साधतील. त्याच प्रमाणे  ‘माझा रंगप्रवास’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी संवाद साधतील. 
 
शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचा रविवारी समाराेप हाेणार असून  कुसुमाग्रज स्मारकात होत असलेला हा महाेत्सव कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.  
 
रविवारच्या सत्रात ‘भारतीय संस्कृतीचे पुनरावलाेकन’ या विषयावर देवदत्त पटनायक संवाद साधतील. ‘लेखन : करिअर की छंद’ या विषयावर सावी शर्मा अाणि नीलिमा दालमिया-अधार या संवाद साधतील. स्नेहल एकबोटे यांच्या ‘मिलाफ शब्द आणि रंगांचा’ या कार्यशाळेमध्ये विविध भारतीय लिपी आणि रंग यांची सांगड घालून तयार केलेल्या कलाकृती शिकायला मिळणार आहेत.  या कार्यशाळेमध्ये ब्राह्मी, मोडीसारख्या ऐतिहासिक लिपी वापरून कलाकृती तयार करता येणार आहेत. 
 
‘सीमा अाेलांडणारे सिनेसाहित्य’ या विषयावर अालाेक शर्मा, अबीद सुरती अाणि अनुपम सिन्हा हे संवाद साधतील. ‘मालिकांचे मानसशास्र’ यावर सचिन माेटे, सचिन गाेस्वामी, चिन्मय उद‌गीरकर हे संवाद साधतील तर ‘समीक्षा मराठी कादंबरीची’ यावर सुधीर रसाळ, ऋषिकेश गुप्ते, ‘साहित्याचे डिजिटल रूप’ यावर निखिल  सचान, निलाेफर मिलान तर ‘अ वर्ल्ड अाॅफ पाॅसिबिलिटीज‌्’ यावर पार्थाे भाैमिक संवाद साधतील. 
 
‘फेक न्यूज : लाेकशाहीपुढील अाव्हाने’ या विषयावर विराग गुप्ता, रवींद्र अांबेकर, मंदार भारदे, मनाेज गडनीस संवाद साधतील तर ‘ना उजवे ना डावे : व्यावहारिक राजकारण’ यावर राजीव साने, दीपक करंजीकर संवाद साधतील तर ‘द हार्ट अाॅफ द मॅटर’ यावर अाशिष चाैधरी, डाॅ. सुधीर अाजाद, नीलम चव्हाण, ‘कवी कट्टा’मध्ये प्रकाश हाेळकर, तुकाराम धांडे, संताेष वाटपाडे, राजेंद्र उगले व पल्लवी पटवर्धन, ‘सिनेमा कसा पहावा’ यावर गणेश मतकरी तर ‘मिलाफ शब्द अाणि रंगाचा’ या कार्यशाळेत स्नेहल एकबाेटे संवाद साधतील.

पटनायकांशी संवाद
पुराणकथांमधील सत्य आणि मिथ्याचा शोध घेणारे लेखक म्हणून परिचित देवदत्त पटनायक यांची उपस्थिती हे या फेस्टिव्हलचे लक्षवेधी वैशिष्ट्य आहे. पंधरा वर्षे औषधशास्त्र क्षेत्रात काम करून ते लेखनाकडे वळाले. पौराणिक कथांना आधुनिक बाज हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. 
 
पुढील स्‍लाइडवर...‘कबीर कॅफे’ने रंगणार संध्याकाळ...आणि लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये आजचे कार्यक्रम..
 
 
बातम्या आणखी आहेत...