आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराण शास्त्र ही रुपकांची दुनिया, पण यातून सत्‍याजवळ जाण्‍याचा प्रयत्‍न- देवदत्त पटनायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भक्ती, श्रद्धा, विश्वास, सत्य अशा संकल्पनांचा विविध दृष्टिकोनातून वेध घेत प्रसिद्ध लेखक देवदत्त पटनायक यांनी रविवारी दुपारी साहित्य रसिकांच्या मनातील अनेक शंकांचे अत्यंत खुसखुशीत पद्धतीने निरसन केले. दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलच्या अखेरच्या दिवशी पटनायक यांचे 'शिफ्टिंग सॅंड आॅफ टाइम- फॅक्ट, मिथ आॅर रिएलिटी' या विषयावर अभय सदावर्ते यांनी संवाद साधला.
 
सुमारे दोन तास रंगलेल्या या संवादात पटनायक यांनी सत्य या मानवी जीवनातील महत्त्वाच्या संकल्पनेला महाभारत, भगवद्गीता व अन्य पुराण कथांच्या अंगांने उलगडून दाखवले. पुराण कथा ही रुपकांची दुनिया आहे. पण या दुनियेतून सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मानवी श्रद्धा ही विज्ञानासारखी गणिती नाही तो एक विचार आहे. या विचारात विश्वास ठेवला जात असून श्रद्धा हे विश्वासाचे सत्य असल्याचे त्यांनी सांगितले. अनंत, गणपती, कृष्ण किंवा राम यांना आपण वास्तव किंवा कल्पना म्हणू शकत नाही. तो एक विचार आहे. विचाराला पुरावा असतो. पण हॅरी पाॅटर, सुपरमॅन हे सुपर हिरो या कल्पना आहेत. राम किंवा कृष्ण वा मिथककथा हे आख्यानाचे सत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
 
शेकडो वर्षांपासून या कथा स्त्रोत्र , प्रार्थना अशा विविध गीतांमधून आपल्यापर्यंत  आल्या आहेत. मिथककथा या एकच सत्य सांगत नाहीत. कारण भारतीय परंपरा विविधतेची आहे. या विविधतेतून अनेक मिथकं मांडली जातात. अशा असंख्य मिथकांचे खंडित असे सत्य तयार होते. हिंदू संस्कृतीतील मिथक कथांमध्ये देवालाही शाप देण्यात आला आहे. एक सत्य ही असहिष्णुता आहे, कारण प्रत्येक मानवाला वेगवेगळे सत्य गवसत असते. त्यामुळे सत्य एकच असते हा अट्टाहास होऊ शकत नाही आणि विज्ञानही एक सत्य मानत नाही, असे पटनायक यांनी स्पष्ट केले.

भगवद्गीता महाभारताच्या माध्यमातून पाहिली पाहिजे. ती रामायणाच्या नजरेतून पाहता येणार नाहीत हे स्पष्ट करताना पटनायक यांनी त्याग म्हणजे गीता असा गीतेचा सारांश सांगितला. गीतेचे निरुपण प्रत्येक संतांनी आपापल्या नजरेतून व्यक्त केले, असे त्यांनी सांगितले. रसिकांच्या अनेक प्रश्नांचीही त्यांनी अखेरीस उत्तरे दिली.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी काय म्‍हणाले देवदत्‍त पटनायक...
 
 
बातम्या आणखी आहेत...