आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Developer Jailed, Not Complete Row Houses Construction

सदनिका वेळेत न बांधल्याने बिल्डरला तुरुंगवासाची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रो - हाऊससाठी आगाऊ पैसे घेऊन ते बांधणाऱ्या बिल्डरला आठ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याचे आदेश ग्राहक न्याय मंचाने दिले. एखाद्या बांधकाम व्यावसायिकास शिक्षा होण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याला आणखी दोन महिने शिक्षा ठोठवण्यात आली.

तक्रारदार देवीदास भरसट यांनी बांधकाम व्यावसायिक सुरेश देवराम पाटील (रा. बोरगड, म्हसरूळ) यांच्याकडे रो-हाऊस बांधण्यासाठी करार केला होता. त्या बदल्यात एक लाख दहा हजारांची रक्कम पाटील यांना िदली होती. वेळेत बांधकाम पूर्ण केल्याने तक्रारदाराने बांधकाम व्यावसायिकाकडे पैसे परत देण्याची मागणी केली होती. मात्र, ताे टाळाटाळ करत असल्याने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली. ग्राहक न्यायमंचाने दिलेल्या आदेशानुसार बांधकामासाठी घेतलेली रक्कम परत देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. ग्राहक न्यायालयाने या दोन्ही तक्रार अर्जात बांधकाम व्यावसायिकास दोषी ठरवत आठ महिने कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले.
ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळोखे-कुलकर्णी, के. पी. जाधव यांनी हे आदेश दिले. तक्रारदाराकडून अॅड. लोहकरे यांनी कामकाज पाहिले. ग्राहक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने आणखी दोन महिने शिक्षा सुनावण्यात आली.