आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Development News In Marathi, Nashik's Students Created 'dealinday.com' Online Mega Store

नाशिकच्या तरुणांचे ‘ऑनलाइन मेगास्टोर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वेळ अन् श्रम वाचविणार्‍या ई-कॉर्मसच्या आजच्या युगात नाशिकच्या संगणक क्षेत्रातील तीन तरुणांनी नाशिककरांसह इंटरनेटवरील ग्राहकांसाठी dealinday.com हे पहिले ऑनलाइन मेगास्टोर तयार केले असून, येत्या 31 मार्च रोजी ते ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार आहे. इंटरनेटवर सध्या अनेक मेगास्टोरचा पर्याय उपलब्ध असला तरी या मेगास्टोरचे वैशिष्ट्य म्हणजे, शहरातील स्थानिक विक्रेत्यांशी टाय-अप करून ‘सेम डे डिलिव्हरी’ दिली जाणार आहे. नाशकातून सुरू झालेल्या या मेगास्टोरवर सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून, लवकरच किराणा मालासह इतरही वस्तू उपलब्ध होणार असल्याची माहिती मेगास्टोरचे दर्पण जैन व विशाल आहेर यांनी दिली.
‘सेम डे डिलिव्हरी’
‘ऑनलाइन मेगास्टोर’वर ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यास ती प्रत्यक्ष मिळण्यास तीन-चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. परंतु, या मेगास्टोरवर वस्तूची मागणी केल्यास ती त्याचदिवशी मिळते. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. किराणा माल खरेदी करणार्‍या गृहिणींना याचा मोठा फायदा होऊ शकेल.
ग्राहक, विक्रेत्यांना फायदा
ऑनलाइन मेगास्टोरवर शहरातून रोज लाखोंची उलाढाल होते. परंतु, वस्तू मिळण्यास विलंब होणे तसेच सदोष वस्तू असल्यावर ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व उणिवा लक्षात घेऊन आम्ही हे मेगास्टोर तयार केले आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांशी करार करण्याचे काम सुरू आहे. या मेगास्टोरमुळे विक्रेते व ग्राहक दोघांनाही फायदा होईल. -अभिजित इंगले, मेगास्टोर प्रमुख
100 ब्रॅण्ड अन् 3000 प्रोडक्ट्स होणार उपलब्ध
सध्या हे मेगास्टोर ऑफलाईन सुरू असून, गेल्या महिन्यात त्यातून 3 लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. परंतु, ग्राहकांसाठी हे मेगास्टोर ऑनलाईन खुले होणार असून, त्यावर मोबाईल, कॉम्प्युटर, किचन्स, होम अप्लायन्सेस असे हजारो प्रोडक्ट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यासाठी 25 स्थानिक विक्रेत्यांशी टाय-अप करण्यात आले आहे. मे महिन्यांपर्यंत किराणामालही विक्रीसाठी उपलब्ध होईल, तर एप्रिलअखेरपर्यंत सात हजार वस्तू उपलब्ध करण्यात येणार आहे.