आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Development On Ramkund Issue At Nashik, Divya Marathi

रामकुंडावर लवकरच बसविणार संरक्षक जाळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वाहनतळावरील गाडी थेट गोदावरीत जाऊन पडल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाला रामकुंड परिसरात नदीकाठी संरक्षक जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या जाळ्या बसविल्यास भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टळण्याची शक्यता आहे.
रामकुंड परिसरात साई मंदिरामागील पटांगणावर भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
मात्र, या ठिकाणी संरक्षक जाळ्या वा अन्य अडसर नसल्याने वाहने गोदापात्रात जाण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गुरुवारी अशाच घटनेत परगावच्या एका भाविकाची इंडिका कार थेट लक्ष्मणकुंडात पडली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने पार्किंगच्या ठिकाणांवर नदीकडेला संरक्षक जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव दिला जाणार आहे. नगरसेवक राहुल ढिकले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पाचवी घटना
गोदावरीच्या पात्रात वाहने पडण्याची गुरुवारची ही पाचवी घटना आहे. यातील चार घटनांची रामकुंड पोलिस चौकीमध्ये नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपाययोजनांअभावी दुर्घटना
भाविकांची वाहने नदीपात्रात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. नदीपात्र उथळ असल्याने गाडी बुडत नाही. मात्र, वाहन बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची दमछाक होते. अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या नसल्याने घटना घडतात.
प्रशासनाला लवकरच देणार प्रस्ताव
गोदापात्रात वाहने पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाकडे अशा घटनांना आळा घालण्यासाठी नियोजन नाही. पार्किंगच्या ठिकाणी संरक्षक जाळी लावल्यास संभाव्य घटना टळल्या जाऊ शकतात. त्यासाठी लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल. राहुल ढिकले, नगरसेवक