आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुक्ते यांच्या बदलीने विकास आराखड्यावर प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - वादग्रस्त ठरलेला प्रारूप शहर विकास आराखडा नव्याने तयार करण्यासाठी नियुक्त विभागीय नगरविकास सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची पुण्याच्या विभागीय सहसंचालकपदी शासनाने शुक्रवारी बदली केली. यामुळे प्रारूप विकास आराखड्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदलीमागे विशिष्ट गटाचे षडयंत्र असल्याची जोरदार चर्चा आहे.
भुक्ते यांची तीन वर्षांपूर्वी नियुक्ती झाली होती. गेल्या वर्षी महापालिकेला सादर झालेला प्रारूप शहर विकास आराखडा वादग्रस्त ठरल्याने, तसेच जनविरोधामुळे महासभेने तो फेटाळला व राज्य शासनाने नव्याने आराखडा करण्याचे आदेश दिले. नव्याने प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भुक्ते यांची नियुक्ती केली व डिसेंबर २०१४ पर्यंत आराखडा तयार करण्याची मुदत दिली.
भुक्ते यांनी शहरवासीयांना विश्वासात घेऊन हरकती मागवल्या. एक हजारपेक्षा अधिक नागरिकांनी हरकती घेतल्या. आराखड्यात शेती, राहते घर, ले-आऊट जाणाऱ्या तक्रारदारांशी वैयक्तिक चर्चा केली. कोणावरही अन्याय होणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच, हरकतीच्या ठिकाणी भेट देऊन समस्या, तक्रारी, अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास निर्माण झाला होता. त्यांच्या जलद कामामुळे आराखड्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे.
अतिरिक्त जबाबदारी
भुक्ते यांची बदली झाली असली तरी नाशिक विभागाच्या सहसंचालक पदावर शासनाने अद्याप कोणाचीच नियुक्ती केलेली नाही. तसेच, भुक्ते यांच्याकडे पुणे विभागासह प्रारूप शहर विकास आराखडा तयार करण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.
कृती समितीचा विरोध
भुक्ते यांच्या बदलीस विकास आराखडा कृती समितीने विरोध केला आहे. समितीचे नमिंत्रक आर्किटेक्ट उन्मेष गायधनी, व्यापारी बँकेचे अध्यक्ष नविृत्ती अरिंगळे, त्र्यंबकराव गायकवाड, मधुकर गायकवाड आदींनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भेटीचे प्रयत्न सुरू केले आहेत.