आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मे महिनाअखेर विकास आराखडा जनता दरबारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींच्या राेषानंतर सुरू झालेल्या नवीन विकास आराखड्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, मे महिनाअखेरीस विकास आराखडा जनता दरबारी हरकती सूचनांसाठी सादर हाेणार आहे. नवीन विकास आराखड्यात आरक्षणांची संख्या कमी असण्याचे संकेत असून, या पार्श्वभूमीवर एेन उन्हाळ्यात शहरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

साधारण दाेन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये नाशिक शहराच्या विकास आराखड्यावरून माेठे वादळ निर्माण झाले हाेते. विकास आराखडा शासनाला सादर करण्याच्या प्रक्रियेत असतानाच अचानक फुटल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षणे पडली, तर तुलनेत धनदांडग्यांच्या जमिनी संरक्षित राहिल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यातून पुढे बिल्डरधार्जिणा, शेतकरीविराेधी असे अनेक आक्षेप वा आराेप करीत सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. पाठाेपाठ राजकीय पटलावर विकास आराखड्याचे पडसाद उमटून महासभेत सर्वपक्षीयांनी एकजूट दाखवत लाल कंदील दाखवला. त्यानंतर विकास आराखड्याचा निर्णय शासनाच्या काेर्टात गेला एेन लाेकसभा िनवडणुकीच्या धामधुमीत विकास आराखडा रद्द करून नवा आराखडा करण्याचे आदेश शासनाने िदले. त्यानंतर तत्कालीन सहसंचालक सुलेखा वैजापूरकर यांची बदली करून त्यांच्या जागी प्रकाश भुक्ते यांची नियुक्ती करण्यात आली.

भुक्ते यांनी विकास आराखड्याचे काम सुरू केल्यानंतर ताक फुंकून घेण्याची भूमिका घेतली. दाेन महिन्यांपूर्वी भुक्ते यांनी महापालिकेतील पदाधिकारी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या अपेक्षा, सूचना समज-गैरसमज जाणून घेण्याचे प्रयत्न केले. विकास आराखडा जाहीर करण्यासाठी जूनपर्यंत मुदत हाेती. मात्र, तत्पूर्वीच काम पूर्ण झाल्यामुळे आता अखेरचा हात फिरवला जात आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा अखेरपर्यंत विकास आराखडा प्रसिद्ध हाेण्याची शक्यता आहे.

प्रक्रिया अशी राहील
विकासआराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर ६० दिवस लाेकांच्या, रहिवाशांच्या वा अन्य संबंधितांच्या हरकती वा सूचना जाणून घेतल्या जातील. त्यानंतर चार तज्ज्ञांमार्फत चिकित्सा वा छाननी करून त्याचा अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर सहा महिन्यांत शासन आराखड्याला मंजुरी देईल. गरज वाटल्यास सहा महिने मुदतवाढही मिळू शकते.

जवळपास काम पूर्ण
पुढीलमहिन्यात आराखडा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. जवळपास सर्व काम पूर्ण झाले असून, प्रसिद्धीनंतर हरकती-सूचना जाणून घेतल्या जातील. त्यानंतर तज्ज्ञांमार्फत शासनाला अहवाल पाठवला जाईल.- प्रकाशभुक्ते, सहसंचालक,नगररचना विभाग
बातम्या आणखी आहेत...