आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत अनावश्यक खर्चाला लावा कात्री; खासगीकरणातून करा अाता नाेकरभरती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीत ‘दत्तक नाशिक’ची घाेषणा करून सत्ता मिळवल्यानंतर वाढलेले अपेक्षांचे अाेझे कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न भाजपच्याच अंगलट अाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दत्तक नाशिक’च्या पहिल्याच बैठकीनंतर २१७८ काेटींच्या अाराखड्यातील अधिकाधिक निधी कसा उभारता येईल, याबाबत महापालिकेने पूर्ण अभ्यास करून प्रस्ताव तयार करावा त्यानंतर येणाऱ्या तुटीबाबत राज्य शासन मदत करेल, असे सांगत चांगलाच झटका दिला. 
 
िनवडणूक प्रचारसभेतील मुख्यमंत्र्यांच्या अाश्वासक विधानानंतर भाजपचे कमळ महापालिकेत फुलले. मात्र, त्यांचे ‘दत्तक विधान’ स्थानिक भाजप नेत्यांच्या चांगलेच लक्षात हाेते. मेट्राेवर फुली; शहरात खासगी बससेवेची चाचपणी : महापालिकाक्षेत्रात १० हजार काेटी रुपये खर्चून मेट्राे सुरू करण्याची महापाैरांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. स्मार्ट सिटीचा भाग असलेल्या वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचाच एक भाग म्हणून शहरात खासगी बससेवा सुरू करता येईल का यावर चाचपणी केली जाणार अाहे. प्रामुख्याने त्यासाठी बीअारटीएस वा तत्सम खासगी बससेवेबाबत विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. नवीन वाहन खरेदी करता एस.टी. महामंडळाच्या अाहे त्या बसेस वा भाडेतत्त्वावर बस घेऊन काही करता येईल का याबाबत शाेध घेण्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्यावर माफक दरात त्यांच्या स्वत:ची वाहने असलेली बससेवा चालवणाऱ्या काही एजन्सी संपर्कात असल्याचे सांगितले. मात्र, जागेची अडचण असून राज्य शासनाने जागा दिल्यास खासगी वाहतूकदारांना डेपाे अन्य कारणासाठी देता येईल. याबाबत नक्की मार्ग काढू असे सांगत खासगी बससेवा सुरू करण्याबाबत एक स्वतंत्र सल्लागारामार्फत दाेन महिन्यांत व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे अादेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे यापूर्वी वादग्रस्त ठरलेली खासगी बससेवा सुरू हाेते का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले अाहे. 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली बैठकीत तंबी 
केवळ तांत्रिक पदांसाठीच महापालिकेमार्फत भरती अतांत्रिक पदे ठेकेदारी सेवेने भरणार 
२१७८ काेटी उभारणीची जबाबदारी पालिकेवरच; राज्य शासन देणार तुटीचे पैसे 
पालिकेची अार्थिक स्थिती इतकी नाजूक अाहे की गेल्या चार वर्षांत अायुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाइतकाही खर्च झालेला नाही. मुख्य म्हणजे, अंदाजपत्रकात गृहित धरलेले उत्पन्नही पदरात पडलेले नाही. २०१६-१७ या गेल्या अार्थिक वर्षात ११०० काेटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न असताना हातात जेमतेम १०२० काेटी रुपयेच हाती पडले अाहेत. अशा स्थितीत दाेन हजार काेटींच्या वाढीव प्रस्तावासाठी पालिका पैसे अाणणार काेठून, हाच माेठा प्रश्न अाहे. 
 
प्रतिनिधी नाशिक
‘दत्तक नाशिक’च्या शब्दपूर्तीसाठी महापालिकेत झालेल्या बैठकीत पालिकेची अार्थिक स्थिती नाजूक असल्याचे लक्षात घेत यापुढे अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याची तंबी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनामार्फत अभियंता, डाॅक्टरांसारखी तांत्रिक पदे भरावी तर सफाई कामगार वा तत्सम अतांत्रिक पदे खासगीकरणातून भरावी, असे स्पष्ट अादेशही दिले. महापालिकेत सुमारे २७५ तांत्रिकपदे असून, याउलट अडीच हजारांहून अधिक अतांत्रिकपदे असल्यामुळे महत्त्वाच्या सेवा ठेकेदाराच्या हाती जाणार असल्याचेही स्पष्ट हाेत अाहे. 
दत्तक नाशिकच्या अाढाव्यात निधीचा प्रश्न कळीचा ठरला. महापालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे यापुढे वायफळ खर्चाला अाळा घालावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महापालिकेत अनेक वर्षांपासून नाेकरभरतीच झाली नसल्यामुळे प्रशासनाची पकड ढिली झाल्याचा मुद्दा सादरीकरणात उपस्थित झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तांत्रिकपदे पालिकेने स्वत: भरावी अन्य अतांत्रिकपदे खासगीकरणातून भरावी, अशा सूचना केल्या. जनतेचा सर्वच पैसा कर्मचाऱ्यांच्या पगारात घालवायचा नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. दरम्यान, तांत्रिकपदांची संख्या कमी असल्यामुळे माेठ्या संख्येने नाेकरभरतीद्वारे महापालिकेत कायमची हक्काची सरकारी नाेकरी मिळवण्याचे स्वप्न भंगणार अाहे. पालिकेत हजारांपेक्षा अधिक पदांची गरज असून, त्यात तीन हजारांपेक्षा अधिक अतांत्रिकपदे असल्यामुळे नाेकरीच्या अपेक्षेवर अवलंबून असणाऱ्यांची निराशा हाेणार अाहे. या बैठकीला पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गाेडसे, हरिश्चंद्र चव्हाण, अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापाैर रंजना भानसी, उपमहापाैर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सर्वपक्षीय गटनेते, अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते. 

सत्ता मिळवताना दिलेली अाश्वासने पूर्ण केली नाही तर काय गत हाेते, याबाबतचे मनसेचे उदाहरण लक्षात घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘दत्तक नाशिक’ची बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लकडा लावला हाेता. महापालिकेची अार्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे राज्य शासनाच्या निधीतून महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचाही प्रयत्न त्यामागे हाेता. प्रत्यक्षात, ‘दत्तक नाशिक’च्या अनुषंगाने महापालिकेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सारेकाही शांतपणे एेकून घेत अपेक्षांना चांगलीच टाचणी लावली. ते म्हणाले की, पालिकेचा प्रस्ताव बघितल्यानंतर याेजनानिहाय किती खर्च हाेईल याबाबत पुन्हा अभ्यास करून पालिका कशा पद्धतीने निधी उभारणी कशी करू शकते यावर विचार करावा. 

महापाैरांना हवेत १८ हजार काेटी... : राज्यशासनाकडून महापालिकेला पाच वर्षांसाठी तब्बल १८ हजार काेटी रुपये हवे अाहेत. खुद्द महापाैर रंजना भानसी यांनीच असे निवेदन दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही धक्का बसल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. मेट्राेसाठी दहा हजार काेटी, नवीन रिंगराेड, उड्डाणपूल, नदीवर पूल बांधण्यासाठी एक हजार काेटी, जैवविविधता संवर्धनासाठी ५०० काेटी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ५०० काेटी, अाैद्याेगिक वसाहतीत मलनि:सारण व्यवस्थेसाठी एक हजार काेटी, २० खेड्यांच्या विकासासाठी ५०० काेटी, विकास अाराखड्यातील अारक्षणे संपादनासाठी एक हजार काेटी, साधुग्राममधील २७५ एकर जागेच्या भूसंपादनासाठी २५०० काेटी, शहरातील अाेव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी एक हजार काेटी असा निधी मागितला अाहे. 
 
हे चार प्रकल्प अजेंड्यावर 
१)घनकचरा व्यवस्थापन 
२) सांडपाणी व्यवस्थापन 
३) पिण्याचे पाणी 
४) वाहतूक व्यवस्था 

गंगापूर धरणालगत साेलर पॅनलसाठी जागा 
गंगापूरधरणालगत साेलर पॅनलसाठी जागा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात अाली त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास करण्याचे अादेश नगरविकास विभागाला दिले. साेलर पॅनलद्वारे पालिकेचा पाणीपुरवठ्यासाठी महावितरणवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. 

स्मार्ट सिटीसाठी करवाढीची शक्यता 
स्मार्टसिटीसाठी स्थापन केलेल्या विशेष उद्देशीय वाहनप्रणाली अर्थातच एसपीव्हीला स्वत:चे उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. उत्पन्नवाढीचा प्रमुख पाया करवाढ हा असल्यामुळे एकप्रकारे करवाढीच्या मुद्यात पालिकेचा हस्तक्षेप नसावा, असेही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जाते. 

पालिकेत फडणवीस तिसरे 
महापालिकेत बैठकीनिमित्त येणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पहिलेच ठरले. यापूर्वी मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे हे माजी महापाैर स्व. शांतारामबापू वावरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी अाले हाेते तर स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अाले हाेेते. 
महापालिकेतील बैठकीत मार्गदर्शन करताना मु‌ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत पालकमंत्री गिरीश महाजन. 

पालिकेचा पाय खाेलात; निधी येणार काेठून? 
दाेन विषय मार्गी, दाेन अव्यवहार्य... 
मुख्यमंत्र्यांनीचार विषय अजेंड्यावर असल्याचे सांगितले; मात्र त्यातील दाेन यापूर्वीच मार्गी लागलेले असून दाेन प्रयाेग शहरात व्यवहार्य नसल्याचे अाधीच स्पष्ट झाले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...