आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devgiri Engine Slide In Egatpuri, Railway Track Disturbed

‘देवगिरी’चे इंजिन इगतपुरीत घसरले, रेल्वे ट्रॅकला 22 ठिकाणी तडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - सिकंदराबादहून नांदेडमार्गे मुंबईला जाणा-या देवगिरी एक्स्प्रेसचे इंजिन इगतपुरीजवळ शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घसरत सुमारे एक किमीपर्यंत पुढे गेले. या दुर्घटनेमुळे रेल्वे ट्रॅकला जवळपास 22 ठिकाणी तडे गेले. यानंतर मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दुपारी काम पूर्ण होईपर्यंत मुंबईकडे जाणा-या गाड्या टिटोलीच्या यार्डातून संथगतीने वळवल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. देवगिरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी अन्य गाड्यांमार्फत मुंबई गाठली. या घटनेनंतर मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची व चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली होती. काहींनी कसारा स्थानक गाठून लोकलचा आधार घेतला.


भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस, औरंगाबाद-मुंबई जनशताब्दी, वाराणसी-मुंबई एक्स्प्रेस या गाड्या दोन ते अडीच तास उशिराने मुंबईला रवाना झाल्या.