आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनियार यांच्या तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नागरी वस्तीत वाहनांमध्ये अवैधरीत्या गॅस भरण्याचा व्यवसाय खुलेआम सुरू असताना पोलिसांच्या ते गावीही नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नगरसेवक अस्लम मनियार यांनी त्यांच्या वॉर्डात सुरू असलेल्या या व्यवसायाविषयी वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी काणाडोळा केल्यानेच हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे.
मनियार यांनी महासभेत महापालिकेच्या आरक्षित जागेवर नगरसेवकांनी केलेली अतिक्रमणे काढण्याची मागणी केली असता त्याची थट्टा करण्यात आली. पालिकेच्या पथकाने ही अतिक्रमणे काढण्याचे धाडस केले नाही. हा स्फोट झालेल्या परिसरात नगरसेवक व काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेल्या अवैध झोपड्या असून, त्याचे भाडे वसूल केले जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.
अवैध व्यवसाय करणारा नायर कोण, तो कोठून आला, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे याची पोलिसांनी आता तरी खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. भरवस्तीत अवैध व्यवसाय सुरूअसताना व अगदी घटना घडल्यानंतरही आजूबाजूचा एकही नागरिक पोलिसांना माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. त्यांना कोणाची दहशत आहे, याच्या चौकशीची गरज आहे.
महापालिकाही जबाबदार - पोलिसांना वारंवार या व्यवसायाची माहिती दिली; मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. साधा छापाही घातला नाही. त्यांनी कारवाई केली असती तर आजची दुर्घटना टळली असती. महापालिकेत आवाज उठवूनदेखील अतिक्रमण विभागाने आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटविले नाही. या घटनेस पोलिस व महापालिकाच जबाबदार आहे. - अस्लम मनियार, नगरसेवक