आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपंढरपुरामध्ये भक्तांची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - विहितगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साेमवारी अाषाढी एकादशीनिमित्त भरपावसात भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली हाेती. मंदिरातील भजनामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले हाेते.
गावकऱ्यांच्या वतीने गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रशस्त मंदिराची उभारणी केली अाहे. दरवर्षी येथे अाषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या धर्तीवर धार्मिक कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असल्याने मंिदराला प्रति पंढरपूर म्हणून अाेळख निर्माण झाली अाहे.

सोमवारी पहाटे भक्तिधाम मंडळाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची विधीवत पूजा झाली. त्यानंतर नगरसेवक सुनीता काेठुळे यांच्या हस्ते भाविकांना खिचडी केळीचे वाटप करण्यात अाले. अामदार याेगेश घाेलप, प्रभाग सभापती केशव पाेरजे यांच्यासह परिसरातील भाविकांनी भरपावसात दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली हाेती. अाषाढी एकादशीनिमित्त मुक्तिधाम, स्वामिनारायण मंदिर, दुर्गामाता देवस्थानच्या दुर्गामाता मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले. देवळालीत युवासेना लामराेड युवक मित्रमंडळाच्या वतीने गरजू मुलींना अामदार याेगेश घाेलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात अाला.
आषाढीए कादशी निमित्त शहर आणि परिसरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विठ्ठलभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध ठिकाणी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा गजर करत दिंड्या निघाल्या. काॅलेजरोड, गंगापूररोड, नाशिकरोड, देवळालीगाव, पंचवटी, सिडको, सातपूर, देवळालीगाव, विहितगाव, जेलरोड येथे महिला, विद्यार्थी यांनी दिंडी काढली होती, तर काॅलेजरोड येथील कौमुदी प्रेरित महिला संघाच्या सुनीता तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली १४ महिला भजनी महिला मंडळांनी काॅलेजरोड येथील विट्ठल मंदिर ते गंगापूर रोडवरील विठ्ठल मंदिरापर्यंत सुमारे २०० महिलांनी िदंडी काढीन विठ्ठल नामाचा गजर केला.
महिलांनी रिंगण करून फुगड्या खेळल्या. नारायणी भजनी मंडळ, तुळजाई, महालक्ष्मी, वरदलक्ष्मी, मुक्ताई, कल्याणी, अन्नपूर्णा, तुळजी भवानी, जोगेश्वरी, सप्तशंृगी, राधाकृष्ण, कुलस्वामिनी, आशापुरी, आदी भजनी मंडळानी सहभाग घेतला होता. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, योगीता आहेर, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, निशीगंधा मोगल, विजया राऊत आदी उपस्थित होत्या.

‘चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी तो पहा विटेवरी’, ‘बोलावा विठ्ठल, विठ्ठल विट्ठल’, ‘ग्यानबा तुकाराम’ अशा विविध जयघोष तसेच अंभंगाच्या आवाजात शहरातील विठ्ठल मंदिर, सोसायटी परिसर, उद्यानांमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तर काॅलेज रोड आणि गंगापूर रोड परिसरातील महिला भजनी मंडळांनी दिंडी, रिंगण फुगडी खेळून प्रति पंढरपूरचा आनंद येथे घेतला.

विहितगाव येथील प्रति-पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी (दि. २७) दर्शनासाठी गर्दी केली होती.
नूतन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी काॅलेजराेड भागात सकाळच्या सुमारास अाषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली.

अनमाेल नयनतारा रहिवासी काॅलनीतील मुलांनी दिंडी साेहळा अायाेजित केला होता.
काैमुदी प्रणीत महिला संघ १४ भजनी मंडळांचा गंगापूरराेड येथे दिंडी रिंगण सोहळा