आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhammacakra Pravartanadin,latest News In Divya Marathi

धम्मचक्र प्रवर्तनदिनी बुद्धवंदना, बुध्द विहारात बौद्ध बांधवांची गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- अशोकविजयादशमी तथा ५८ वा धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा करण्यासाठी हजारो बौद्ध अनुयायांनी त्रिरश्मी लेणी येथील बुध्द विहारात शुक्रवारी बुद्धवंदनेसाठी मोठी गर्दी केली होती.
पांढरा पोशाख परिधान करून आलेले बौद्ध बांधव गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक झाले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध शहरांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भिक्खू संघ भोजन, बुद्धवंदना, बुद्ध गीते यांच्यासह पंचशील धम्म ध्वजारोहण असे विविध कार्यक्रम या वेळी उत्साहात झाले. विविध स्थानिक संस्था, तसेच सामाजिक संघटना यांच्या वतीनेही सार्वजनिक बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भदन्त धम्मवियो महास्तवीर, भदन्त हर्षबोधी महास्तवीर, भदन्त हर्षबोधी, भदन्त धम्मदीप आदींसह मान्यवर उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनामुळे शुक्रवारी सकाळपासूनच बुद्ध विहारात बौद्ध बांधवांची वर्दळ सुरू झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. बुद्धगीतांनी या कार्यक्रमांची शोभा वाढविली. विशेष म्हणजे काही परदेशी पर्यटकांनीही या ठिकाणी भेट देत या दिवसाचे महत्त्व जाणून घेतले. तसेच, बुद्धवंदनेतही ते सहभागी झाले होते. नाशिकसह जिल्ह्यातूनही काही बांधव आले होते.

पुस्तक वस्तू खरेदीलाही बौद्ध बांधवांची पसंती
कार्यक्रमाच्याठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. तसेच, पुस्तकांसह प्रतिमा तसेच, पुतळे विक्रीचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. ही पुस्तके वस्तू खरेदी करण्यासाठीही बौद्ध बांधवांची पसंती लाभली होती.