आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षा आम्हा दिली भीमाने...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सम्राट अशोक विजया दशमी तसेच 57 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूज्यनीय भन्तेजींना महासंघदान, भोजनदान या कार्यक्रमांसह बुद्ध-भीम गीते, धम्मसभा, धम्मगुरूंचे प्रवचन आदी कार्यक्रमही लेण्यांच्या पायथ्याशी झाले. शहरातील हजारो धम्मबांधवांनी याप्रसंगी सामुदायिक बुद्धवंदना केली. नालंदा एज्युकेशनल अँड सोशिअल ट्रस्ट व नाशिक महापालिकेतर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

परिसरात ठिकठिकाणी धम्मबांधवांसाठी महाप्रसाद व खीरदान करण्यात येत होते. पालकमंत्री छगन भुजबळ व महापौर अँड. यतिन वाघ यांच्या उपस्थितीत धम्मध्वजारोहण करण्यात आले. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र ऑफीसर्स फोरम, बँक ऑफ महाराष्ट्र एससी/एसटी असोसिएशन, अंधर्शद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भदन्त धम्मदीप, भदंत बुद्धिवंत बोधी, भदंत विनयप्रिय, भदंत धम्मशरण, भदंत करुणाकीर्ती, भदंत धम्मकीर्ती यांच्या सह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कोशिरे, नगरसेविका कविता कर्डक, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, सातपुर सभापती विलास शिंदे, नगरसेवक प्रकाश लोंढे, भगवान दोंदे, कमलाकर तिवडे, रतन तिवडे, छाया तिवडे आदी उपस्थित होते.

यावेळी नाशिक मनपा ट्युबरक्युलोसिस सोसायटी, जागृती सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नागरिकांना क्षयरोगाविषयी माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त तथागत बुद्धाला वंदन करण्यासाठी त्रिरश्मी लेण्यांवर आलेल्या शहर आणि परिसरातील हजारो बुद्ध बांधवांना महामार्गासह अंतर्गत वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. वाहतुकीचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले दिसत होते. वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थाच करण्यात आलेली नव्हती. मुंबई नाशिक महामार्गापासून पाथर्डी फाट्यापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्रिरश्मी लेण्यांच्या प्रवेशद्वारासमोरील भुयारी मार्गासमोर उभा असलेला वाहतूक पोलिस केवळ बघ्याची भूमिका पार पाडत होता.