आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन्वंतरी जयंती दिन अाता ‘राष्ट्रीय अायुर्वेद दिवस’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीत साजरा हाेणारा धन्वंतरी जयंतीचा दिवस अाता राष्ट्रीय अायुर्वेद दिन म्हणून देशभर साजरा हाेणार अाहे. केंद्रीय अायुष मंत्रालयाने नुकतेच याबाबत अादेश दिले अाहेत. यंदा २८ अाॅक्टाेबर राेजी हा दिवस साजरा हाेत अाहे. या दिवसाकरिता ‘अायुर्वेदाच्या माध्यमातून मधुमेहाचे नियंत्रण’ ही संकल्पना जाहीर करण्यात अाली अाहे. अांतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेल्या याेग दिवसाइतकेच महत्त्व अायुर्वेद दिनाला असल्याचे मानले जाते.

सध्या अांतरराष्ट्रीय पातळीवर सात एप्रिल हा ‘जागतिक अाराेग्य दिवस’ म्हणून साजरा केला जाताे. मात्र अापल्याकडे देशपातळीवर स्वतंत्रपणे असा अाराेग्य दिवस साजरा हाेत नाही. त्यामुळेच अाराेग्याची देवता असलेल्या धन्वंतरींची जयंती हाच अाराेग्य दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी अायुर्वेदाशी निगडित विविध संस्था, व्यक्ती, संघटना यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून हाेत हाेती. अाराेग्य भारती संस्थेनेही सातत्याने ही मागणी लावून धरली हाेती. ३० सप्टेंबर राेजी देशातील निवडक १५ डाॅक्टर्सची एक बैठक दिल्लीत झाली. त्यात अाराेग्य भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, नाशिकचे वैद्य विजय कुलकर्णी यांनी, तत्कालीन केंद्रीय अाराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याकडे ही मागणी केली हाेती. त्याला सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला हाेता. त्यानुसार अाता केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली अाहे.

अायुष्याचे ज्ञान देणारे शास्त्र
चार हजार वर्षांपूर्वीचे वैद्यकशास्त्र म्हणून अायुर्वेदाकडे पाहिले जाते. राेगांना प्रतिबंध करणे यातून सहज शक्य अाहे. अाहार, विहार, मानवी शरीर, अाजूबाजूचे वातावरण, त्याचा मानवी शरीरावर हाेणारा परिणाम यांचा विचार करून या शास्त्रातून उपचार केला जाताे. जीवनप्रणाली व अायुष्याचे ज्ञान देणारे शास्त्र म्हणून अायुर्वेदाकडे पाहिले जाते. म्हणूनच सर्वच पॅथींचे देवता म्हणून धन्वंतरीचे पूजन केले जाते.

व्यापक प्रमाणावर साजरा हाेणार दिन
सर्व राज्यांतील अायुष विभाग, अाराेग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये विभाग, अायुर्वेद महाविद्यालये, यातील अाैषध कंपन्या अादींनी ‘अायुर्वेद िदन’ साजरा करण्यासाठी सहभागी हाेण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या अायुष मंत्रालयाने िदले अाहेत. अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला हे यश म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया नाशिकचे वैद्य विजय कुलकर्णी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...