आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रख्यात ‘नाशिक ढोल’चा वारसदार हरपला, बडे ढोलवाले निसारभाई अन्सारी यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चित्रपटांची पाटी फिरवणे असो की गणपतीची मिरवणूक, मोहरम असो की संदल या प्रत्येक ठिकाणी आव्वाज असतो तो नाशिक ढोलचा. यात बडे ढोलवाल्यांचे आपले स्वतंत्र वैशिष्ट्य... ढोल-ताशांच्या तालावरून बड्या ढोलला ओळखता येते. या ढोलचा उद‌्गाता निसारभाईंनी काळ गाजवला. अर्थात, निसारभाईंनी ढोल कधी वाजविला नाही, मात्र ढोल पथकाचे बॉस मात्र ते तब्बल ६० वर्षे राहिले. हा साठ वर्षांचा प्रवास रमजानच्या पवित्र पर्वात सोमवारी थांबला...

साधारणत: १९६० च्या दशकात मुल्तानपुरा भागात वस्ताद खलीलभाई यांना बड्या ढोलने मोहिनी घातली. त्यांनी स्वत: पत्र्याचा ढोल आणि ताशा तयार केला. एका विशिष्ट तालात तो वाजविला तर छान संगीत तयार होते, हे त्यांना उमगल्याने त्यांनी गल्लीतली दोन-चार पोरं जमा केली आणि नाशिक ढोल या नव्या वाद्यप्रकाराला जन्म दिला. त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे अब्दुल रेहमान अन्सारी यांनीही गळ्यात ढोल-ताशे अडकविले आणि स्वतंत्र ग्रुप तयार करून व्यवसाय म्हणून ढोल-ताशांचा उपयोग करायला सुरुवात केली. त्यांच्याकडेच निसारभाई हा छोटासा मुलगा ढोल वाजवू लागला.

फार काळ निसारभाईंनी ढोल वाजविला नाही. पण, ढोल वाजविण्याची कला मात्र त्यांना पूर्णत: अवगत झाली. आपला स्वतंत्र ढोल का नसावा, असा प्रश्न त्यांना पडला आणि अब्दुलभाईंपासून विभक्त होत आपले स्वतंत्र पथक त्यांनी तयार केले. निसारभाईंनी ढोल-ताशाला आधुनिक रूप दिले. पारंपरिक प्रकारांमध्ये अडकून बसता त्यांनी ढोल सर्वदूर पोहोचवला. अर्थात, लहानपणीच त्यांनी ढोल हातात धरला.

बडे ढोलवाले निसारभाई अन्सारी यांचे निधन
मनोजकुमार चागोरा और काला सनी देओलचा नरसिंहा या चित्रपटात बडे ढोलवाल्यांचा ढोल लक्षवेधी ठरला आहे. त्यामुळे या ढोलला वेगळी ओळख मिळाली. निसारभाईंचा दिलदारपणा आठवणीत राहील

निसारभाईंचा दिलदारपणा आठवणीत राहील. बडे ढोलवाले पथकातील सर्वच वादकांना त्यांनी यंदा इदीही दिली हाेती. कदाचित त्यांना हे पवित्र कार्य जाण्यापूर्वीच करायचे असेल. जुबेरमुख्तारअन्सारी, निसारभाईंचे चुलतभाऊ