आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhule Lok Sabha Constituncy News In Marathi, Mahayuti, Malegaon, Divya Marathi

कट्टर विरोधकांचे ‘एकमत’,‘मालेगाव मध्य’ व ‘बाह्य’मध्ये बदलली परिस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - धुळे लोकसभा मतदारसंघात येणार्‍या ‘मालेगाव मध्य’ व ‘मालेगाव बाह्य’ विधानसभा मतदारसंघात परस्पर कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे मालेगावचा ‘माहौल’ या नेत्यांच्या ‘एकमत’चा नजारा सध्या अनुभवतो आहे. मुळात काहींची अपरिहार्यता व काहींना पक्षनिष्ठा वाहण्याशिवाय पर्याय नाही, अशा बिकट परिस्थितीने हा चमत्कार केला आहे. मात्र, यामुळे काग्रेस आघाडी व महायुती अशा दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच ‘सोय’ झाली आहे.
धुळे मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात येतात. त्यामुळे भौगोलिक व महसुलीदृष्ट्यादेखील उमेदवारांसाठी हा मतदारसंघ कसरतीचा ठरतो. प्रत्येक गावात किमान प्रचाराची एक फेरी झाली तरी प्रचाराचा महत्तवाचा टप्प्या संपतो, अशी अवस्था आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील उमेदवारांची मोठी मदार ही स्थानिक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांवर असते. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप व कॉँग्रेसच्या उमेदवाराला जनता दल नेते निहाल अहमद यांनी आव्हान देत उमेदवारी केली होती. यामुळे निहालभाई विजयाच्या किनार्‍यापर्यंत गेलेले नसले तरी मतांची विभागणी झाली व याचा फायदा भाजपच्या प्रताप सोनवणे यांना झाला.
सध्याच्या निवडणुकीत मात्र मालेगावातून मते विभागणीचा फटका कॉँग्रेसला बसण्याची चिन्हे नाहीत. प्रमुख दावेदारी करणारा उमेदवार तर मालेगावातून नाहीच. या पलीकडे म्हणजे स्थानिक जनमानसावर प्रभाव असणारे नेते निहाल अहमद, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद, राष्ट्रवादीचे नेते युनूस इसा हे परस्पर विरोधक असले तरी कॉँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल यांच्या गळाला ते लागले आहेत. याच मोटबांधणीत कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद यांच्यावर यंत्रणा कार्यान्वित करण्याची मोठी जबाबदारी आहे. परंतु, स्थानिक स्तरावर विरोध मावळल्याचे ‘फील गुड’ सध्या काँग्रेस अनुभवत आहे. स्थानिक नेत्यांची ही दिलजमाई अपरिहार्य ठरली तरी पटेलांच्या मात्र ती सोयीची ठरली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा त्यांचा ताप व व्याप या वेळी वाचला आहे.
याउलट परिस्थिती ‘मालेगाव मध्य’ विधानसभा मतदारसंघात आहे. येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीसाठी आमदार दादा भुसे व जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे एकत्र आले आहेत. भुसेंना पक्षादेश तर हिरेंची अपरिहार्यता असा हा योगायोग. त्यामुळे ‘मालेगाव मध्य’मध्ये पटेल व ‘बाह्य’मध्ये डॉ. भामरे यांना एकगठ्ठा मतांचा फायदाच होईल. परंतु मतदानाच्या वेळी स्थानिक नेते किती पश्रिम घेतात यावर गणित ठरतात, हे विसरण्यासारखे नाही.