आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजार हटविण्यात अडचणी, अनिश्चितता कायम; अायुक्तही पडले पेचात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंबड लिंकराेड येथील वादग्रस्त भंगार बाजार हटविण्यातील अडचणींचा डाेंगर अद्यापही कायम असून, खुद्द अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम हेच पेचात असल्यामुळे भंगार बाजार कधी हटणार, असा प्रश्न निर्माण झाला अाहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भंगार बाजार हटवणे वा स्थलांतरणाचा मुद्दा गाजत अाहे. भंगार बाजार शहरातील गुन्हेगारीचे मूळ असल्याचेही अाराेप झाले. निवडणुकीच्या प्रचारातही भंगार बाजाराचा मुद्दा केंद्रस्थानी राहिल्यामुळे हा विषय अत्यंत नाजूक झाला अाहे. शिवसेनेचे माजी सभागृहनेते दिलीप दातीर यांनीही अनेक वर्षापासून भंगार बाजाराविराेधात न्यायालयीन लढाई सुरू ठेवली अाहे. अशातच भंगार बाजार हटवण्यासाठी सर्वाेच्च न्यायालय अनुकूल असले, तरी पुरेशी तयारी झाल्यामुळे महापालिकेची अडचण अाजदेखील कायम अाहे. नुकतीच न्यायालयाने महापालिकेकडून भंगारबाजार हटवला जात नसल्यामुळे निर्णयाचा अवमान केला जात असल्याची खंत व्यक्त करीत, पुन्हा कारवाईची तंबी दिल्याचे वृत्त अाहे. मात्र, यासंदर्भात पालिकेला कारवाईला सुरुवात काेठे करायची हाच माेठा प्रश्न अाहे.

ज्या ठिकाणी उद्याेग अाहेत तेथे भंगार बाजाराची नितांत गरज असून, इतका माेठा बाजार स्थलांतरित करण्यासाठी अावश्यक जागा, त्यासाठीचे अारक्षण याचाही शाेध घेणे महत्त्वाचे अाहे. त्याबराेबरच अतिक्रमण काढण्यासाठी अावश्यक मनुष्यबळ, त्यासाठी पाेलिस बंदाेबस्त अशी एक नाही अनेक अडचणी असल्याचे खुद्द अायुक्तांनीच पत्रकारांशी बाेलताना कबूल केले. मात्र, भंगार बाजार काेणत्याही परिस्थितीत हटवलाच जाईल असे सांगत त्यासाठी पाेलिस अन्य शासकीय यंत्रणेची एकत्रित बैठक घेऊन नियाेजन करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...