आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीतील बँकांचा त्रास व्हावा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अापल्याकडे शहरी भागातील सर्वसामान्यांना, छाेट्या व्यावसायिकांना व लहान उद्याेजकांना नागरी सहकारी बँका विशेष पसंत असतात. जिल्हा व तालुक्यांच्या शहरांत अनेक नागरी सहकारी बँका चांगले काम करीत असून लाेकप्रिय झालेल्या अाहेत. या बँकांची संख्या व काम या दाेन्ही बाबतीत महाराष्ट्र राज्य अाघाडीवर अाहे. सुमारे सतरा टक्के बँकिंग याच बँकांद्वारे हाेते. देशातल्या पहिल्या पंचवीस नागरी सहकारी बँका महाराष्ट्रातील अाहेत व त्यांचे त्यांच्या ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांचे बरे चालले अाहे
बँकांच्या संख्येबाबत महाराष्ट्र आघाडीवर, देशातील पहिल्या २५ नागरी सह. बँका राज्यातीलच अापल्याकडे शहरी भागातील सर्वसामान्यांना, छाेट्या व्यावसायिकांना व लहान उद्याेजकांना नागरी सहकारी बँका विशेष पसंत असतात, जिल्हा व तालुक्यांच्या शहरांत अनेक नागरी सहकारी बँका चांगले काम करीत असून लाेकप्रिय झालेल्या अाहेत. या बँकांची संख्या व काम या दाेन्ही बाबतीत महाराष्ट्र राज्य अाघाडीवर अाहे. सुमारे सतरा टक्के बँकिंग याच बँकांव्दारे हाेते. देशातल्या पहिल्या पंचवीस नागरी सहकारी बँका महाराष्ट्रातील अाहेत व त्यांचे त्यांच्या ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांचे बरे चालले अाहे.
लहान बँकांनी सुदृढ व्हावे वा मोठ्या बँकांत सामील व्हावे
काही लहान व मध्यम अाकाराच्या नागरी सहकारी बँका त्रासात अाहेत, काही रखडत चालू अाहेत तर काहींना अवसायनात काढण्यात अाले अाहे. या बँकांवर प्राथमिक मूलत: व अंतिमत: नियंत्रण रिझर्व्ह बँकेचेच अाहे व सहकार खात्यालाही मार्गदर्शन पाहणी, तपासणी, लेखापरीक्षण याचे अधिकार अाहेत. नागरी सहकारी बँकांवर एकूणच विशेष लक्ष दिले जाते. बैद्यनाथ कमिटीच्या अहवालाचे एका वाक्यात सार अाहे, बँकांनी सुदृढ, समर्थ व्हावे ते जमत नसेल तर सुदृढमध्ये सामील व्हावे व ते जर जमत नसेल तर संपून जावे.
ठेवीदारांच्या हितासाठीच रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
ही संपून जाण्याची प्रक्रिया, इशारा, ताकीद कारणे दाखवा, निर्बंध प्रशासक व तरी अावरले नाही तर सामिलीकरण व ते हाेत नसेल तर अवसायनाने संपून जाणे अशी हाेते. बँका ह्या सर्वसाधारणपणे गैरव्यवहार, गैरप्रकार, गैरव्यवस्थापन ह्यापैकी एक किंवा दाेन्ही-तिन्ही व साथीला अतिस्वार्थीपणा यामुळे त्रासात येतात. कर्जे थकतात, एनपीए वाढतात व मुद्दलासह व्याजवसुली थकली की बँकेच्या हातावर खडखडाट हाेऊन बँकेचे व्यवहार बंद पडायला लागतात. अशी चिन्हे दिसली की भारतीय रिझर्व्ह बँक या बँकांवर निर्बंंध घालते. मुख्यत: ठेवीदारांना रकमा द्याव्यात व थकीतकर्ज वसूल करावी व नवीन तसेच वाढीव कर्ज देऊ नयेत, असे निर्देश असतात. निर्बंध अाले की पैसे काढायला ठेवीदार गर्दी करतात व संबंधित बँक अजून त्रासात येते. ठेवीदारांचे हित जपण्यासाठी निर्बंध येतात व त्यात अंतिम उद्देश चांगला असला तरी त्यामुळे लहान माेटे ठेवीदार घाबरतात. कधी एकदा पैसे काढताे असे त्यांना हाेते, यातून मग बँकेची अार्थिक स्थिती खालावत जाते व बँक पुढे जाऊन त्रासात येते. याचा बराच काळ अाधी लक्षात घेतला गेला तर उपाययाेजना, बँक सावरण्यासाठी वेळीच करता येतील, पण जर समजा बँकेची परिस्थिती सावरण्याची शक्यता खूप कमी असेल तर परिस्थिती अजून वाईट हाेण्यापूर्वी, त्वरेने बँक सामील िकंवा संपविण्याचे मार्ग लवकर सुरू करावेत, हे बरे हाेईल.
बँक त्रासात अाली म्हणून चांगले कर्जदार अडचणीत येऊ नयेत
बँकेवर निर्बंध अाले की ठेवीदारांइतकेच प्रामाणिक काम करणारे, व्यवस्थित कर्ज फेड करणारेही त्रासात येतात. त्यांची चूक नसते पण परिस्थिती त्यांच्यावर काेसळते. त्यांच्या कर्जव्यवहारात अडचणी येतात व त्यांच्या वाढीव अार्थिक गरजा पुऱ्या हाेत नाहीत. बँकेचे पैसे भरणे व नव्या बँकेचा रस्ता धरणे, हे कर्जदारांना करावे लागते. त्याचे त्यांच्या धंद्यावर, व्यवसायावर वाईट परिणाम हाेतात. धंदे, उद्याेग, व्यवसाय हे जर अाधीच त्रासात असतील तर ते बंदही पडतात. हे असे प्रकार हाेण्यापूर्वी संबंधित चांगल्या व्यवस्थित काम व परतफेड करणाऱ्या कर्जदारांना अन्य बँकांनी पुढाकार घेऊन अाधीच्या बँकेची त्यांची कर्ज भरण्याची व्यवस्था केली पाहिजे. बँक त्रासात अाली म्हणून चांगले कर्जदार अडचणीत येऊ नयेत म्हणून त्यांची काळजी घेतली जावी. निर्बंध अाले की मुदतठेवीच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे नूतनीकरण करण्यास सांगितले जाते व त्या त्यांना मिळत नाहीत, ठरवलेल्या कामासाठी ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने ते त्रासात येतात. अशावेळी बँकेला चांगल्या बँकेत सामिलीकरणाचा प्रस्ताव पुढे येताेे. प्रयत्न होतो, पण गती फार संथ असते. वर्ष दाेन वर्ष हे काम रेंगाळते. ठेवीदारांना नियमित कर्जदारांना वाट पाहत बसावे लागते, हा काळ त्यांच्याकरिता प्रचंड त्रासाचा असताे. हा काळ कमी झाला तर मग बरेच प्रश्न मार्गी लागतात.
ठेवींना हवे विमा संरक्षण, रक्कम लगेच मिळावी
संबंधित बँकांकडे, ठेव विम्याइतकी म्हणजे प्रत्येकी एक लाख रुपये देण्याइतकी रक्कम असते. पण बँकेवर निर्बंध अाले व बँक संपवायचा निर्णय दुर्दैवाने घेतला गेला की, ठेवीदारांना रकमा द्यायचे निर्णय शांत व संथपणे हाेतात. खरे तर ठेव विमा संरक्षण असेल तर ठेवीदारांना प्रत्येकी एक लाखाची रक्कम लगेच मिळायला हवी. अगदी मुदतठेव असली तरी त्या ठेवीतील किमान एक लाख रक्कम ठेवीदाराला मिळायला पाहिजे. पण तसे हाेत नाही. संबंधित बँक त्रासात अाल्यामुळे ठेव विमा संरक्षणाइतकी रक्कम ठेवीदारांना द्यावी लागणारच असते तर ती शक्य तितक्या लवकर दिली तर ठेवीदार व बँका, दाेघांना त्याचा लाभ हाेईल.