आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयात झाला कलाकारांचा कल्ला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नेहमी पेक्षा तासभर आधीच महावदि्यालयात रेलचेल सुरू झाली, आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी कशीतरी जागा पकडण्याची धडपड दिसत होती. कुणाची भांडणं, तर कुणी दबा धरून दारातच वाट पाहत उभे होते. वदि्यार्थी जमू लागले आणि अलोट गर्दी झाली. अचानक कुणी टाळ्या वाजवल्या की, गर्दी वाटेकडे पाहत होती. तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचल्यावर अखेर गर्दीतून काही चमकणारे चेहरे वाट काढत मंचाकडे आले.. एकच कल्ला सुरू झाला. सुव्रत जोशी, पूजा ठोमरे आणि पुष्कराज चिरपुटकर यांनी धमाकेदार एन्ट्री मारली.

एचपीटी, आरवायके महावदि्यालयांमध्ये कला मंडळ स्थापनेच्या निमित्ताने कलाकारांनी भेट दिली. बुधवारी (दि. १२) हा कार्यक्रम झाला. नव्या कोऱ्या कलाकारांची क्रेझ पाहता महावदि्यालयाचे वातावरण दोस्तीमय झाले होते. यांच्या मैत्रीचे किस्से तरुणांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर मुला-मुलींचा कल्ला सुरू झाला. कुठे कलाकारांच्या नावांचा नामघोष सुरू होता, कुठे गर्दीत सेल्फी काढण्यासाठी बेंचवर चढून धडपड सुरू होती. शेवटपर्यंत यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक जण जीव तोडून ओरडत होते.

महावदि्यालय प्रशासनाला गर्दी सांभाळणे मुश्कील झाले. पाहुण्यांना नदिान मंचावर दोन गोष्टी बोलू द्या, यासाठी शिक्षकांसह उपप्राचार्यदेखील सातत्याने विनंती करत होते. मात्र, वदि्यार्थी ऐकत नव्हते. शेवटी कलाकारांनीच ‘नाशिककडून आमची ऐकून घेण्याची अपेक्षा आहे’ असे म्हणत दिलाचा ठाव घेतला. कलाकारांच्या एका हाकेवर तरुण त्यांच्याशी संवाद साधण्यास तयार झाले.
अभिनेता पुष्कर याच्या एका आवाजावर वदि्यार्थी शांत झाले, तो क्षण.. छाया- प्रतीक राजोळे

प्रारंभी शे-दोनशे.. मग अलोट गर्दी...
कार्यक्रमासाठीफार वदि्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळणार नाही, असे म्हणत सुरुवातीला शंभर, नंतर दोनशे आणि नंतर सभागृह तुडुंब भरले. लायब्ररीच्या रीडिंग रूममध्ये झालेल्या या कार्यक्रमात लायब्ररीचे बेंच एवढी गर्दी पाहून धन्य झाले असतील, अशा गमतीशीर प्रतिक्रिया येत होत्या.
यावेळी कलाकारांसोबत वदि्यार्थ्यांना शिक्षकांनाही सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.