आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilasa Care Center, Latest News In Divya Marathi

ज्यांना वृद्धार्शमानेही नाकारले त्यांना इथे मिळतो ‘दिलासा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-ज्यांचे कुणीच नाही. घरातील मुले विचारत नाहीत. वृद्धत्वामुळे आलेल्या आजारपणात ज्यांची नीटशी देखभाल केली जात नाही. आजारपणामुळे र्जजर झाल्याने नैसर्गिक विधीदेखील बेडवरच करावे लागतात. अपघात किंवा वृद्धत्वामुळे परावलंबित्व नशिबी आलेल्या ज्या वृद्धांना वृद्धार्शमातही स्वीकारले जात नाही, अशा वयोवृद्धांना त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत चांगलं जीवन जगण्यासाठी आसरा देणार्‍या ‘दिलासा’ या संस्थेचे कार्य खरोखरच अतुलनीय आहे.
नाशिकच्या लेखानगर परिसरातील सिडको कार्यालयामागे असलेल्या ‘दिलासा केअर सेंटर’ची ही रुग्णसेवा 10 वर्षांपासून प्रसिद्धीविना अव्याहतपणे सुरू आहे. सध्या ‘दिलासा’मध्ये एकूण 45 वृद्ध आणि दोन युवकांना आयुष्यभराचा निवारा देण्यात आला आहे. त्यातील ज्या वयोवृद्धांना काही आर्थिक रक्कम देणे शक्य असते, त्यांच्याकडून शक्य ती रक्कम घेऊन, तर ज्यांना काहीच देणे शक्य नाही अशा निम्म्याहून अधिक वयोवृद्धांना पूर्णपणे मोफत सांभाळले जाते.
नोकरी सोडून घेतला समाजकार्याचा वसा : संगणक क्षेत्रातील त्यावेळी हजारो रुपये आणि सध्याच्या काळात लाख-दीड लाखाहून अधिक रुपयांपर्यंत पगार मिळू शकणारी नोकरी सोडून सतीश जगताप या युवकाने 10 वर्षांपूर्वी या कार्याला प्रारंभ केला. लग्नापूर्वी केवळ समाजसेवा म्हणून सुरू असलेले हे कामच पुढे सतीश आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला यांचे जीवनध्येय झाले आहे. केवळ एक-दोन वृद्धांपासून प्रारंभ केल्यानंतर आजच्या घडीला साधारणपणे 50 वयोवृद्ध रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य अहोरात्र सुरू आहे.