आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilit Writer Baguls Remembrance Program Me Issue At Nashik

तू राणा भीमाचा.. बाबूराव बागुल यांना अभिवादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड -
तू विद्रोहाचा वारा, तू तथागताची धारा,
क्रांतीबाचा अखंड मारा,तू राणा भीमाचा..

या गीताने ज्येष्ठ कवी मधुकर जाधव यांनी दलित साहित्यिक बाबूराव बागुल यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन केले. जेलरोडच्या संबोधी सभागृहात त्रैमासिक परिवर्तन जनता परिवारातर्फे कविसंमेलनातून शब्दांजली रिती करण्यात आली.

विद्रोहाची चळवळ इथली अग्निफुलांनी सजवत गेले.. या गझलकार गौरवकुमार आठवले यांच्या गझलसह कवी अरुण घोडेराव यांच्या ‘नको तो स्वर्ग, नको तो योग, मजपाशी प्रयोग, विज्ञानाचा.. या कवितेला रसिकांची दाद दिली. ‘फॅण्ड्री’ चित्रपटावर अँड. अशोक बनसोडे यांनी नागनाथ, वेगळंच असते ना रे, जगण्याचे वास्तव आणि सिनेमॅटिक वास्तव.. याचे वर्णन केले. निर्भया हत्याकांडावर प्रा. गंगाधर अहिरे यांनी ‘आला कळप कळप, त्याने घातली झडप, जीव कोवळा कोवळा, रक्ताळला सरेआम’ या कवितेने रसिक भावूक झाले. संमेलनात कैलास पगारे, अशोक भालेराव, प्रदीप जाधव, रोहित गांगुर्डे, नंदराम दिवे यांनी कविता सादर केल्या. तर वंदना गायकवाड यांनी बुद्धाचा धम्म आवडे मला, बौद्धाचार्य प्रकाश जगताप यांच्या गीतांनी मैफलीत रंगत आली. कवी काशीनाथ वेलदोडे यांनी ‘वेदा आधी तू होतास’ ही कविता सादर केली. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.