आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यविश्‍व : संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याशी संवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याशी साहित्य रसिकांना संवाद साधता येणार आहे. या कार्यक्रमात रसिकांना साहित्यविषयक तसेच संमेलनाध्यक्षपद आणि त्या अनुषंगाने साहित्यासंदर्भात होणारी कामे या विषयी गप्पा होणार आहे.
पिंपरी-चिंचवड येथे जानेवारी महिन्यात होणार असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिकरोड शाखेच्या वतीने संमेलनाध्यक्षांशी संवाद साधता येणार आहे. हा कार्यक्रम आशानगर, नाशिकरोड येथील सांस्कृतिक सभागृहात शनिवारी (दि. ५) सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मसाप, नाशिकरोड शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...