आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल मालकासह दोघांच्या हत्येप्रकरणी 15 जणांना कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी - नाशिक पेठ रस्त्यावरील गोळ्शी फाटा येथील हॉटेल आरतीमध्ये झालेल्या दोन जणांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 15 संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजार केले. या वेळी न्यायालयाने सर्वांना 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हॉटेल आरती येथे बुधवारी रात्री तीन जण मद्यपान करण्यासाठी गेले होते. या वेळी हॉटेल मालक रमेश सोनवणे यांचा त्यांच्याशी वाद झाला होता. त्यामुळे सोनवणे यांच्यासह हॉटेल कर्मचार्‍यांनी तिघांना बेदम मारहाण केली होती. यात श्रीराम पांडू शेखरे याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गोळ्शी येथील 200 जणांच्या जमावाने हॉटेलवर गुरुवारी सकाळी सशस्त्र हल्ला करत हॉटेलची तोडफोड करून हॉटेल मालक रमेश सोनवणे व कामगार मनोहर राजाराम पाटील यांना बेदम मारहाण केली. यात ते जागीच ठार झाले होते.

गोळशी गावात धरपकड सुरूच
गोळशी येथील 200 जणांनी हॉटेलवर हल्ला केला होता. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी येथील काही जणांना ताब्यात घेताच येथील काही जणांनी गावातून पळ काढला आहे.त्यामुळे दिवसभर गावात शुकशुकाट जाणवत होता ,तर हॉटेल आरती व गोळ्शी फाटा येथे पोलिस
बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.