Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Dink Ladu In Winter Session

डिंक लाडू मिळताहेत 400 रुपये किलोने

प्रतिनिधी | Jan 05, 2012, 11:11 AM IST

  • डिंक लाडू मिळताहेत 400 रुपये किलोने

नाशिक: थंडी म्हटली की खाणे आणि व्यायाम या दोहोंना ऊत येतो. तरुणांपासून वयस्कर नागरिकांपर्यंत खाण्याचे आणि व्यायामाचे सध्याच्या हेल्थ कॉन्शिअस काळामुळे फार मोठे प्रस्थ निर्माण झाले आहे. त्यातही थंडीच्या दिवसांमध्ये पौष्टिक समजला जाणारा सुकामेवा व डिंकाचे लाडू, अळिवाचे लाडू, मेथीचे लाडू यांना मागणी वाढत आहे.
सुक्या मेव्यामध्ये काजू, खारका, बदाम यांना अधिक मागणी आहे. तसेच रक्तातील लोह वाढविणारे अंजीर, पिस्ता आदी पदार्थांनाही मागणी आहे. काजू, बदाम, पिस्ता आदींपासून तसेच गायीच्या तुपापासून बनविलेल्या डिंकाच्या लाडूंना अधिक पसंती दिली जात आहे. हे डिंकाचे लाडू 400 रु किलो या दराने सध्या उपलब्ध आहेत तर मेथीचे लाडू 300 रुपये किलो आणि अळीवाचे लाडू 200 रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत. सुक्या मेव्यामध्ये काजू 470 ते 680, बदाम - 380 ते 410 रु, खारीक 35 ते 150, आक्रोड 200 ते 750, अंजीर 250 ते 600, पिस्ता 580 ते 900, जर्दाळू 180 ते 320, किसमिस 80 ते 130 रु किलो या दराने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या सुक्या मेव्यांनी युक्त शिरा, लापशी असे विविध पदार्थ घरी केले जातात.
व्यायामप्रेमींनी बहरला जॉगिंग ट्रॅक
थंडीच्या दिवसांमध्ये व्यायामप्रेमींची गोल्फ क्लब, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणी गर्दी वाढली आहे. भल्या पहाटे व सायंकाळी 6 वाजेनंतर ट्रॅकवर जॉगिंग वा वॉकसाठी हे व्यायामप्रेमी जमत आहेत. व्यायामाबरोबरच गप्पाटप्पांनाही येथे हे नागरिक वाव देताना दिसतात.

Next Article

Recommended