आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका सभागृहनेतेपदी दिनकर पाटील यांची नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पक्षांतर अाणि विविध अांदाेलने यामुळे नेहमीच चर्चेत असलेले नगरसेवक दिनकर पाटील यांची महापालिकेच्या सभागृहनेतेपदी शुक्रवारी (दि. २६) नियुक्ती करण्यात अाली. महासभेत त्यांच्या नावाची अचानक घाेषणा करण्यात अाल्याने अनेकांना धक्का बसला. 
जनता दलात राजकीय कारकीर्द सुरू करणारे दिनकर पाटील यांनी काही काळानंतरकाँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाचे शहराध्यक्षपद भूषविले. काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक लढवित त्यांनी महापालिकेत प्रवेश केला. लाेकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला हाेता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते भाजपवासीय झालेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचा विजय झाला, मात्र त्यांच्या मुलाचा पराभव झाला. या पराभवाचे खापर त्यांनी थेट अामदार सीमा हिरे यांच्यावर फाेेडत वरिष्ठांकडे तक्रार केली हाेती. त्यानंतर अाता महापालिकेच्या सभागृहनेतेपदासाठी ते काही दिवसांपासून प्रयत्न करीत हाेते. मात्र, गत अनुभव लक्षात घेत त्यांच्या नावाला पक्षांतर्गत विराेधही सुरू हाेता. परंतु, पालकमंत्री अाणि प्रदेशाध्यक्षांच्या मदतीने त्यांची सभागृहनेतेपदावर वर्णी लागली. या पदासाठी उद्धव निमसे, शशिकांत जाधव यांची नावे चर्चेत होती. नियुक्तीनंतर महासभेत पाटील यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 
बातम्या आणखी आहेत...