आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinkar Patil News In Marathi, BJP, Divya Marathi, Nashik

दिनकर पाटील यांचा पक्ष प्रवेशांने भाजपला दोन नगरसेवकांचा लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काँग्रेसमध्ये राहताना कॉँग्रेसच्याच पदाधिकार्‍यांशी शाब्दिक चकमक करणारे म्हणून ओळख असलेल्या दिनकर पाटील यांनी रविवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. कार्यक्रमावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी घरात घेण्यापूर्वीच घर न बदलण्याचा सल्लाही दिला. प्रभाग 17 च्या पोटनिवडणुकीत पाटील भाजपकडून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले. पाटील यांच्या पत्नीही नगरसेविका असल्याने भाजपच्या पदरात दोन नगरसेवक पडल्याचे बोलले जाते आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बसपात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, अर्ज करण्यास 10 तारखेपर्यंत मुदत असल्याने या प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री डॉ. डी. एस. आहेर, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप, सुरेश पाटील, प्रा. सुहास फरांदे, गोपाळ पाटील, नगरसेवक कुणाल वाघ, नाना शिलेदार, विक्रम नागरे आदी उपस्थित होते.

भाजप बहुजनांचा पक्ष
भाजपला पूर्वी ब्राम्हणांचा पक्ष म्हणून संबोधले जात. मात्र, हा पक्ष बहुजनांचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. तुम्ही अनुकूल परिस्थितीत अतिशय चांगल्या कुटुंबात प्रवेश केल्याचे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.