आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dinkar Patil News In Marathi, BJP, Nashik, Divya Marathi

दिनकर पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत बहुजन समाज पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविणारे दिनकर पाटील हे आपल्या सर्मथकांसह रविवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात समारंभपूर्वक प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार गिरीश महाजन व शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

हॉटेल अयोध्या (सातपूर) येथे रविवारी दुपारी 4 वाजता प्रवेश सोहळा होणार आहे. पाटील यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देत बसपात प्रवेश केला होता. त्यामुळे प्रभाग 17 मध्ये रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येथून ते निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याचे प्रयत्न शिवसैनिकांच्या विरोधामुळे विफल ठरल्याने भाजप प्रवेशाचा निर्णय त्यांनी घेतला.