आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट मुंबईतून आणले पेट्रोल आणि डिझेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पानेवाडी प्रकल्पातून वाहतूक करणार्‍या इंधन वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपावर मात करण्यासाठी प्रशासनाने थेट मुंबईतूनच पेट्रोल व डिझेल उपलब्ध केले असून, पानेवाडीतूनही पोलिस बंदोबस्तात सोमवारी सायंकाळी नाशिकसह राज्यातील बारा जिल्ह्यांत इंधन पुरवठा करण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात पंपांवर इंधन असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला.

टॅँकरचालकांच्या संपात दोन दिवसांपूर्वी डीलर्सनीही सहभाग नोंदवला. त्यामुळे जिल्ह्यात इंधनाची भीषण टंचाई निर्माण झाली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी कंपनीचे संचालक सुब्रह्मण्यम यांनाच परिस्थितीवर नियंत्रणासाठी सूचना केल्या. त्यावर मुंबईसह इतर इंधन डेपोतून पुरवठा करण्याचे आश्वासन सुबह्मण्यम यांनी दिले. त्यानुसार रविवारीच मुंबईतून 100 किलो लिटर (केएल) पेट्रोल आणि 182 किलो लिटर डिझेलचा पुरवठा करण्यात आला. स्वत:चे टॅँकर असलेल्या डिलरांनाही पुरवठा करण्यासाठी आदेश देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत पानेवाडीतून 388 के. एल. पेट्रोल आणि 931 के. एल. डिझेलचा 85 टॅँकरने पुरवठा करण्यात आला. नियमित 810 केएल पेट्रोल आणि 24 केएल डिझेल पुरवठय़ापैकी निम्मा पुरवठा करण्यात आला.

परिस्थिती चांगली
इंधनाचे वितरण महामार्ग आणि अधिक खपाच्या पंपांवरही व्यवस्थितरीत्या करण्यात आले. सोमवारी पानेवाडीतून बर्‍यापैकी इंधन उपलब्ध झाल्याने व इतर कंपन्यांच्या इंधन पुरवठय़ात तुलनेत वाढ करण्यात आल्याने परिस्थिती चांगली आहे. महेश पाटील, पुरवठा अधिकारी