आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयाेन्मुख खेळाडूंना नामांकितांचे मार्गदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अांतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक असलेल्या विभागीय क्रीडासंकुलात अॅथलेटिक्स बराेबरच इतर अनेक खेळांची सुविधा उपलब्ध केली असली तरी संकुलाच्या दुरवस्थेमुळे खेळाडू हव्या त्या प्रमाणात त्यांचा लाभ घेत नसल्याने उदयोन्मुख खेळाडूंना सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतसह जिल्ह्यातील नामांकित खेळाडूंचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा जिल्हा क्रीडा विभागाचा प्रस्ताव आहे.

२३ एकरांच्या भव्य जागेत क्रीडासंकुलाची उभारणी झाली आहे. तेथे टेनिस, बॅडमिंटनसाठी दर्जेदार वूडन कोर्ट आहे. व्हॉलीबॉल, एअरोबिक्स अशा अनेक खेळांची तेथे व्यवस्था असून, काही खेळाडूही तेथे नियमित सरावासाठी येतात. पण, या संकुलाची वाताहत झाल्याने खेळाडूंचा उत्साह उतरणीला लागला अाहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे स्वच्छता राखण्यासह सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा विभागास दिले आहेत.

नियमित सरावासाठी या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंकडून वार्षिक वर्गणी घेत संकुलाची डागडुजी करण्याचा विचार आहे. जिल्ह्यात अनेक दर्जेदार खेळाडू असून, त्यांना येथे सुविधांसह याेग्य प्रशिक्षण पुरवले तर ते माेठे यश प्राप्त करतील, असा विश्वास जिल्हा क्रीडा विभागाला अाहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय-अांतरराष्ट्रीय, नावाजलेल्या खेळाडूंशी समन्वय साधत त्यांचे मार्गदर्शन या नव्या दमाच्या होतकरू खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. कविता राऊत, मोनिका आथरे, अंजना ठमके या धावपटूंसह अन्य खेळाडूंशी संपर्क साधण्याचा जिल्हा क्रीडा विभागाकडून प्रयत्न सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत खेळाडूंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता हा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे.

नामांकित खेळाडूंचा हाेकार मिळताच प्रयाेगास प्रारंभ
^कविता राऊत यांच्यासह जिल्ह्यातील इतर नामांकित खेळाडूंचेही मार्गदर्शन अर्थात त्यांनाच प्रशिक्षक म्हणून नेमण्याचा मानस आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या खेळाडूंपैकी काही खेळाडूंशी चर्चाही सुरू आहे. त्यांचा होकार मिळताच हा प्रयोग सुरू होईल. नव्या खेळाडूंना याचा फायदा होईल. संजय सबनीस, जिल्हाक्रीडा अधिकारी
बातम्या आणखी आहेत...