आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही, चौथ्या स्तंभालाही ‘फेक न्यूज’ची कीड, लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये मान्‍यवरांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फेक न्यूज’ कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित विराग गुप्ता, रवींद्र आंबेकर, अनुज खरे, मंदार भारदे. - Divya Marathi
‘फेक न्यूज’ कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित विराग गुप्ता, रवींद्र आंबेकर, अनुज खरे, मंदार भारदे.
 
नाशिक- फेकन्यूज ही लोकशाही शासनव्यवस्था आणि या शासनव्यवस्थेतील चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेला लागलेली कीड असल्याची टीका मान्यवरांनी केली. तसेच आधुनिक काळातील पत्रकारिता आणि लोकशाहीसमोर फेक न्यूज हे नवे आव्हान निर्माण झाल्याची कबुलीही दिली. लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये दुपारी झालेल्या फेक न्यूजवरील चर्चा दावे-प्रतिदावे आणि मतमतांतरांनी रंगतदार झाली. अनुज खरे, रवींद्र आंबेकर, विराग गुप्ता आणि मंदार भारदे यांनी या चर्चेत मते मांडली.
 
काय झाली चर्चा
विराग गुप्ता : एखाद्या घटनेची संपूर्ण वास्तव, सत्य माहिती मांडता काही भागच मांडणे किंवा संपूर्ण विपरीत सांगणे वा दाखवणे, म्हणजे फेक न्यूज हाेय. ‘वास्तवापासून दूर नेणारी नकली बातमी म्हणजे फेक न्यूज’ असे म्हणता येईल. माध्यमांच्या आणि माहितीच्या स्फोटामुळे तसेच समाज माध्यमांच्या प्रसाराने खाेट्या बातम्यांची निर्मिती होते आणि त्यांचा प्रचंड वेगाने प्रसार होत जातो. सामाजिक ताणतणावांचे फेक न्यूज हे सध्या प्रमुख कारण बनते आहे, याविषयी चिंता वाटते.
 
रवींद्र आंबेकर : ‘नकली बातम्यांमुळे लोकशाहीवरचा जनसामान्यांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली विश्वसनीयता गमावून बसतो. पत्रकारितेसमोरचे हे आव्हानच आहे. सोशल मीडिया हे आभासी माध्यम आहे, याचा विसर पडून त्यावर जे मांडले जाते, त्याची विश्वसनीयता किंवा स्रोत तपासता त्याचा फैलाव फॉरवर्डद्वारे केला जातो. पत्रकारितेला हा मोठा धोका आहे.
 
मंदार भारदे : लोकशाही जशी प्रगल्भ होत जाईल, तसे फेक न्यूजचा प्रभावही कमी होत जाईल. सोशल मीडियावर लोक कितीही वावरत असले तरी काय विश्वसनीय आहे, याचा विचार असतो. काही दिवस फेक न्यूजचे असतील; पण पुढचा काळ जबाबदार लोकशाहीचा असेल.
 
फेक न्यूज फैलावण्याची कारणे
- या माध्यमाचा वापर करणाऱ्याची मानसिकता
- फेसबुकवरील बनावट खात्यांचे प्रचंड प्रमाण
- फेक न्यूज पसरवण्यामागील जागतिक पातळीवर कार्यरत कॉर्पोरेट संस्था.
 
फेक न्यूजचे शेअरिंग करणाऱ्यांना पकडा
फेकन्यूजच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सर्वप्रथम फेक न्यूजचे स्रोत शोधा, त्यांची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी बंद करा, फेक न्यूजचे शेअरिंग करणाऱ्यांना पकडा. यासंदर्भातील कायद्याची कठोर अंमलबजावणी करा.
- विराग गुप्ता
 
बातम्या आणखी आहेत...