आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कळवळा सिंहस्थापुरताच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरी नदी याचप्रकारे प्रदूषित होणार असेल तर वेळेपूर्वीच निर्णय घेऊन थेट कुंभमेळाच रद्द करावा, अशा शब्दांत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी जलप्रदूषणाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कुसुमाग्रज स्मारकात आयोजित वसुंधरा चित्रपट महोत्सवाअंतर्गत झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. हे चर्चासत्र विविध प्रश्न व शंकांनी गाजले.

‘कुंभमेळा व गोदावरी स्वच्छता’ हा विषय असलेल्या या चर्चासत्रामध्ये नागरिकांसह लोकप्रतिनिधी व अधिकारी सहभागी झाले होते. नदीची स्वच्छता कुंभमेळ्यापुरती करण्याची कामचलाऊ वृत्ती न बाळगता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे, असा सूर यावेळी उमटला. प्रारंभी विधायक मार्गाने जाणार्‍या या चर्चेला नंतर मात्र विविध पक्षनेत्यांच्या आरोपा-प्रत्यारोपांनी राजकीय रंग चढला होता.

या चर्चासत्रामध्ये महापालिका अधिकारी, विभागीय आयुक्त, लोकप्रतिनिधी, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे राजेश पंडित, तसेच नागरिकदेखील सहभागी झाले होते. विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव हे स्वत:चे मत व्यक्त केल्यानंतर निघून गेले. त्यावर भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी प्रशासनाविरोधी सूर लावत महापालिकेच्या बेजबाबदारपणाचा उद्धार केला. गोदावरी प्रदूषणाची सद्यस्थिती, त्यामागील कारणे, महापालिकेचे होणारी डोळेझाक, उच्च न्यायालयाने महापालिकेची केलेली कानउघाडणी, महापालिकेकडून अपेक्षित उपाययोजना आणि भाविकांची चाललेली चेष्टा अशा विविध मुद्दय़ांवर यावेळी जोरदार चर्चा रंगली होती.