आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिटरेचर फेस्‍टीव्‍हल: वैद्यकीय शिक्षणाच्या खासगीकरणात बाजारीकरणाचे ‘मूळ’, परिसंवादातील सूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पूर्वी अाताच्या वैद्यकीय व्यवसायात खूप माेठे बदल झाले अाहे. वैद्यकीय शिक्षणाच्या खासगीकरणामुळेच या व्यवसायाचे बाजारीकरण सुरू झाले अाहे. धनदांडग्यांच्या हातात गेलेली वैद्यकीय महाविद्यालये, शिक्षणासाठी लागणाऱ्या माेठ्या खर्चामुळे अर्थकारणाला महत्त्व अाले. अाज वैद्यकीय क्षेत्र ही सेवा नसून ताे एक व्यवसाय बनल्याचे मान्य करावे लागेल; मात्र चांगल्या प्रॅक्टिसमधून पुरेसे पैसे मिळू शकतात हे लक्षात घेऊन डाॅक्टरांनीही सचाेटीने काम केले तर रुग्ण त्यांच्यातील ऋणानुबंधाची वीण अधिक घट्ट हाेईल असा सूर ‘वैद्यक नैतिकता : साहित्य जीवन’ या परिसंवादात तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केला.
 
‘दिव्य मराठी’ने वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकारांबाबत सातत्याने लिखाण सुरू ठेवले अाहे. त्यामुळेच सामाजिकदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या या विषयाबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मतेही परिसंवादाच्या रूपातून प्रतित झाली. राजहंस प्रकाशनचे डाॅ. सदानंद बाेरसे यांनी वैद्यकीय क्षेत्रात बदल झाला अाहे का? याविषयी प्रश्न केल्यानंतर त्यावर डाॅ. सुधीर संकलेचा यांनी खासगीकरणाविषयी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण झाल्यानंतर या क्षेत्रात बदलाला सुरुवात झाली. खासगी महाविद्यालय सुरू करणे हे सर्वसामान्यांचे काम नव्हते. राजकारण्यासह धनदांडग्यांनी धडाधड खासगी महाविद्यालये सुरू केली. त्यासाठी लागणारा अमाप पैसा, अावश्यक परवानगी मिळविण्यासाठी लागणारी राजकीय ताकद त्यांच्याकडे हाेती. त्यामुळे पुढे ज्यांच्याकडे पैसा प्रतिष्ठेच्या जाेरावर डाॅक्टर हाेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले.

वैद्यकशास्त्राने प्रगती केली असली तरी, प्रामुख्याने डाॅक्टर रुग्णातील संवाद हरवला अाहे. तसेच संवेदनशीलताही नाहीशी झाली. सेवेएेवजी व्यवसाय म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे बघितले जात अाहे. डाॅ. सुलभा ब्रह्मनाळकर यांनी समाजाची बदलती परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रातील बदलाला कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले. यात त्यांनी डाॅक्टराशिवाय समाज राहू शकत नाही समाजाशिवाय डाॅक्टर नाही ही बाब प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. तसेच यात दुरुस्ती कशी हाेईल याकडे बघितले पाहिजे. डाॅ. श्रीराम गीत यांनी निसर्गाच्या विराेधात जाऊन माणूस जगवण्यासाठी प्रयत्न करण्याची बाब अयाेग्य असल्याचे मत व्यक्त केले. त्यातून अर्थकारण वाढते मर्यादा संपल्यानंतर वस्तुस्थितीचा सामना हाेऊन त्यातून संघर्ष निर्माण हाेताे, असे स्पष्ट केले. पंचाहत्तरीनंतरच्या ज्येष्ठांनी कुटुंबानाच चांगल्या पद्धतीने सांभाळले तर बरेच प्रश्न मिटू शकतात. डाॅ. बाेरसे यांनी पुणे येथे डाॅक्टर रुग्णातील नात्यांची वीण घट्ट हाेण्यासाठी एक संस्था कार्यरत असल्याचे सांगितले.

हे उपाय महत्त्वाचे...
{वैधमार्गाने पुरेसा पैसा मिळताे हे डाॅक्टरांनी लक्षात घेतले पाहिजे.
{डाॅक्टरांनीच पालकत्वाची भूमिका साेडली पाहिजे. निर्णय प्रक्रियेत रुग्णांना सामावले पाहिजे.
{रुग्ण डाॅक्टरांमधील संवाद वाढावा.
{डाॅक्टरांनी रुग्णांना पुरेसा वेळ कसा देता येईल हे बघितले पाहिजे.
{ग्राहक संरक्षण कायदा लक्षात घेत याेग्य पद्धतीच्या नाेंदीही डाॅक्टरांनी ठेवाव्यात.
 
बातम्या आणखी आहेत...