आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diseal Engine Production Starts In Railway Traction

‘रेल्वे ट्रॅक्शन’मध्ये डिझेल इंजिन माेटारनिर्मिती आठवडाभरात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - गेल्या३३ वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रेल्वेच्या ट्रॅक्शन मशीन कारखान्याला अच्छे दिन आले आहेत. येत्या आठवड्याभरात कारखान्यात डिझेल इंजिनच्या ट्रॅक्शन माेटारच्या उत्पादनास सुरुवात हाेणार आहे. लाेकाे ट्रान्स्फॉर्मरच्या उत्पादनाला मंजुरी मिळाली असली तरी तांत्रिक अडचणीमुळे लाेकाे ट्रान्स्फॉर्मरच्या उत्पादनासाठी वाट बघावी लागणार आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी २५ मार्च राेजी ट्रॅक्शन कारखान्याची पाहणी करून कारखान्याच्या विस्तारीकरणाची घाेषणा करून रेल्वे इंजिनच्या सुट्या भागांच्या उत्पादनाचे वाढीव काम देण्याचे जाहीर केले हाेते. यानंतर दाेनच आठवड्यांत अंमलबजावणीचा निर्णय झाला आहे.

तांत्रिक अडचणी : लाेकाेट्रान्स्फॉर्मरच्या उत्पादनासाठी यंत्रणा अद्ययावत अकरण्यासाठी निधीची गरज आहे. स्थानिक प्रशासनाने त्यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून, ताे रेल्वे बाेर्डाला पाठविण्यात येणार आहे. लाेकाे ट्रान्स्फॉर्मरसाठी अॉइल फिल्टरशेन्ट प्लांटची आवश्यकता आहे. लाेकाे ट्रान्स्फॉर्मर सध्या खासगी कंपनीकडून उत्पादन ककरून घेतले जाते. कारखान्यातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर रेल्वे बाेगीतील इन्वहटर, डिझेल विद्युत इंजिनचे ट्रान्स्फॉर्मर, गेरकेस, इंजिनच्या आॅफझलरी माेटर्ससह इलेक्ट्रिक आर्मेचर उत्पादनाची क्षमता २०० पर्यंत वाढणार आहे. सध्या ४० आर्मेचरचे उत्पादन हाेते.

बक्षिसात वाढ : महाव्यवस्थापकसूद यांनी पाहणीदरम्यान कामगारांच्या कामांचे काैतुक करून कारखान्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले हाेते. कामगारांच्या कामाच्या तुलनेत ही रक्कम कमी असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी साेमवारी ६० हजार रुपयांनी बक्षिस रकमेत वाढ केली.

इंजिनच्या सर्व्हिस स्टेशनसाठी प्रयत्न
भुसावळयेथे हाेणा-या रेल्वे इंजिनची सर्व्हिसिंग ट्रॅक्शन कारखान्यात व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष भारत पाटील, सेक्रेटरी, आनंद गांगुर्डे यांनी दिली. कारखान्याच्या निर्मितीच्या वेळीच सर्व्हिस स्टेशन प्रस्तावित हाेते. सर्व्हिस स्टेशनसाठी एकलहरा ते ट्रॅक्शन कारखान्यादरम्यान रेल्वे ट्रॅकला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.

कारख्यान्यात उपलब्ध हाेणार राेजगार
लाेकाेट्रान्स्फाॅर्मर उत्पादनासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दूर झाल्यानंतर कारखान्यातील कामगारांच्या संख्येत हजाराने वाढ हाेणार आहे. - भारतपाटील, अध्यक्ष,नॅशनल मजदूर युनियन

कुशल कामगारांमुळे उत्पादनासाठी प्रयत्न
रेल्वेट्रक्शन कारखान्यात जागा, रेल्वे ट्रॅक कुशल कामगार असल्याने सर्व्हिस स्टेशन सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गाेडसे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. -आनंद गांगुर्डे, सेक्रेटरी,नॅशनल मजदूर युनियन