आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादातून दोन कुटुंबीयात वाद; महिलेला पेटविले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जमिनीच्या वादातून दोन कुटुंबीयांत झालेल्या वादात एकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, संतप्त झालेल्या नातेवाइकांनी त्यानंतर दुसर्‍या गटातील एका महिलेला पेटवून दिले. दोघांचीही प्रकृती गंभीर असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

हरसुल येथील जगन गुणगुणे यांचे नूर मोहंमद शेख यांच्याशी घराच्या जागेवरून वाद सुरू आहेत. रविवारी दुपारी जागेची मोजणी आल्यानंतर गुणगुणे यांनी घराचे शूटिंग का घेतले, अशी विचारणा करीत शेख यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन यात गुणगुणे यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाल्याची तक्रार पत्नी ताराबाई गुणगुणे यांनी दिली. तर शेख यांच्या पत्नी बिलकिस यांना गुणगुणे यांच्या नातेवाइकांनी रॉकेल टाकून पेटवून दिल्याची तक्रार शेख यांनी दिली आहे.