आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय सल्ला देणाऱ्या 5 लाख पुस्तकांचे वितरण, डॉ. कपूर यांची लिम्का बुकमध्ये नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी तसेच तरुण डाॅक्टरांना प्रशिक्षित करण्याचा ज्ञानयज्ञ ६३ वर्षे अव्याहत सुरू ठेवणाऱ्या मुंबईच्या डाॅ. अाे. पी. कपूर यांनी सामान्य रुग्णांना अाराेग्यभान देणाऱ्या ‘फॅमिली मेडिकल गाइड’ या अापल्या पुस्तकांच्या माेफत वितरणाचा तब्बल पाच लाख प्रतींचा टप्पा नुकताच पार केला. विशेष म्हणजे १९६० च्या दशकापासून राज कपूर अाणि बी. अार. चाेप्रा या बाॅलीवूडमधील दाेन्ही बड्या कँपचे ‘फॅमिली डाॅक्टर’ असलेल्या डाॅ. अाे. पी. कपूर यांच्यात अाज वयाच्या ८५ व्या वर्षीदेखील डाॅक्टरांसह सामान्य रुग्णांना शहाणे करून साेडण्याची ऊर्मी कायम आहे. ते सध्या ‘फॅमिली मेडिकल गाइड भाग २’च्या नव्या अावृत्तीत व्यग्र अाहेत.  

किरकाेळ अाजारात रुग्णालयात गेले की डाॅक्टरांकडून उपचारापूर्वीच वेगवेगळ्या महागड्या चाचण्या करण्याचा अाग्रह धरला जाताे. याला डाॅ. कपूर हे अपवाद  अाहेत. अापल्या ज्ञानाचा वापर मर्यादित न ठेवता सामान्य रुग्णांना घरच्या घरी वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी साेप्या भाषेत नि:शुल्क  पुस्तके उपलब्ध करून दिली अाहेत. पदरचे पैसे खर्च करून मराठी, हिंदी, इंग्रजी,अरबी, जर्मनीसह नऊ भाषेत ही पुस्तके वितरित केली. यामुळे  नियमित अाराेग्याविषयी निर्माण हाेणाऱ्या २४ व्याधींविषयी घरी उपचार घेणे शक्य झाले अाहे. वेळेच्या अातच रुग्णालयात केव्हा जावे, संकट कसे टाळावे याविषयी उपाय सुचविण्यात अाले अाहे. 

बाॅलीवूडमधील कपूर घराण्याचे डाॅक्टर  
अार. के. स्टुडिअाेचे पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते राज कपूर ते रणबीर कपूरपर्यंतच्या पाच पिढ्यांचे फॅमिली डाॅक्टर म्हणून डाॅ. कपूर यांची अाेळख अाहे. पृथ्वीराज कपूर यांना वारंवार ताप येत असल्याने त्यांनी मुंबईसह अमेरिकेतही तपासण्या केल्या तरीही निदान हाेत नव्हते. मात्र, डाॅ. कपूर यांनी तपासताच हाॅयकॅन, लिगाेमा नावाच्या कर्कराेगाचे निदान केले. बी. अार.चाेप्रा कँप्सचे एडिटर प्राण मेहरा यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने स्पेशल विमानाने ते श्रीनगरला गेले हाेते. गायक मुकेश वारंवार अाजारी पडत. त्यांच्यावर तपासण्या करण्यात अाल्या. मात्र, निदान हाेत नव्हते. राज कपूरने त्यांना डाॅ. कपूर यांच्याकडे नेले. पहिल्याच तपासणीत मधुमेहाचे निदान केले. त्या वेळी मुकेश यांनी जीवदान मिळाल्याची भावना व्यक्त केली होती.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
डाॅ. कपूर यांना डाॅ. बी. सी. राॅय राष्ट्रीय पुरस्कार, बेस्ट टीचर अाॅफ द मिलेनियम, सीएमईचा जीवनगाैरव, धन्वतंरी अवॉर्ड हे पुरस्कार मिळाले आहेत. ब्रिटिश मेडिकल जर्नल ने गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकार्ड््ससाठी शिफारस केली. त्यांनी १३ पुस्तकांचे लेखन केले. शहरात डाॅक्टरकीच्या काेचिंगसाठी प्रती विद्यार्थी प्रत्येक विषयसाठी ६० हजारांपासून लाखापर्यंत शुल्क अाकारले जाते. या शुल्काचा विचार केला असता डाॅ. कपूर यांनी २५० ते ३०० काेटींची कमाई नाकारत माेफत शिक्षण दिले. याच ज्ञानदानाची लिम्का बुक अाॅफ रेकार्डमध्ये 
नाेंद झाली अाहे.

अायुष्यभर ज्ञानदान  
डाॅ. अाेमप्रकाश कपूर यांनी नि:शुल्क अध्यापनाचा वसाच घेतला अाहे. जेजेच्या ‘नाेलीबाई थिएटर’ येथे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली.  सेवानिवृत्तीनंतर १९८६ मध्ये  त्यांना बाॅम्बे हाॅस्पिटलकडून मेडिकल जर्नलच्या संपादकपदाची माेठ्या पगाराचीही अाॅफर दिली. मात्र, त्याला नकार देत त्यांनी हाॅस्पिटलनजीकचे सभागृह शिकविण्यासाठी उपलब्ध करून देण्याची अट टाकली. तेथे डाॅ. कपूर यांचे अध्यापनाचे कार्य अखंडितपणे सुरू झाले. १९८७ पासून ते अाजतागायात वर्षातून सलग १२ रविवार असे तीन महिने प्रत्येकी ६ ते ८ तासांच्या व्याख्यामालेचे सत्र सुरू अाहेत. यात सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.  
बातम्या आणखी आहेत...