आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM EXPOSE: रुग्‍णाला मिळेपर्यंत अनेक पटींनी महागतात वैद्यकीय साधने, हॉस्पिटलही कमावतात प्रचंड नफा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शस्त्रक्रियेच्या वेळी वापरात येणारे कॅथेटर्स, मोतीबिंदू ऑपरेशन्सनंतर लावल्या जाणाऱ्या लेन्सेस, युरीन बॅग्ज, ऑक्सिजन मास्क यांसारख्या तब्बल १८ साधनांच्या किमतींवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे रुग्णांना २५० ते ५०० टक्क्यांचा भुर्दंड पडत आहे.
 
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने याबाबत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव गेल्या चार महिन्यांपासून धूळ खात पडलेला आहे. अँजिओप्लास्टीसाठी लागणाऱ्या स्टेंट वगळता अन्य १७ साधने अत्यावश्यक औषधांच्या यादीत नसल्याने रुग्णांच्या खिशाला फटका बसत आहे. विशेष म्हणजे या साधनांच्या खरेदी-विक्रीत आयातदार, वितरक आणि काही प्रमाणात रुग्णालये कोट्यवधींचा नफा कमावत असून लाखो रुग्णांना मात्र त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
 
कोणत्याही शस्त्रक्रियांसाठी लागणारे बलून कॅथेटर, गायडिंग कॅथेटर, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांनंतर लागणाऱ्या विविध लेन्स, रुग्ण रुग्णालयात भरती झाल्या क्षणापासून मोठ्या प्रमाणात लागणारे फेस मास्क, ऑक्सिजन बॅग्ज, युरीन बॅग्ज, ऑक्सिजन मास्क, कॅथेटर सेट, डिस्पोजेबल सिरिंज आणि निडल्स या साधनांच्या मूळ किमतींवर अनेक पटींनी वाढीव एमआरपी छापण्यात येतेे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जून महिन्यात याबाबतचा अहवाल राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणास पाठवण्यात आला आहे.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, वैद्यकीय साधनांच्‍या किंमतीत कशाप्रकारे होते जवळपास हजार पटींनी वाढ...

 
उद्या वाचा भाग-2... ‘अत्यावश्यक’ नसल्याने वैद्यकीय साधन विक्रीत लूट...
बातम्या आणखी आहेत...