आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्‍य कर्मचा-यांचे पंकजा मुंडेंना साकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अाराेग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची साेडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना निवेदन देण्यात अाले. अाराेग्यसेविकांना एम.एस.सी.अाय.टी. उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याविषयी शासनस्तरावरून मागणी हाेत अाहे. मात्र, तळागाळात काम करणाऱ्या अाराेग्यसेविकांना कामाच्या ठिकाणी संबधित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सुविधाच नाही. अाराेग्यसेविका सहाय्यिकांना कालबद्ध पदाेन्नतीचा प्रस्ताव निकाली काढून तत्काळ लाभ द्यावा. जिल्हा प्रशिक्षण केंद्रात त्यांची स्वतंत्र पदे निर्माण करावी, कंत्राटी धाेरण रद्द करून कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, निवृत्तीचे वय ६० करावे, बाह्यरुग्ण विभागात दाेन सेविकांची नेमणूक करून प्रत्येकी १२ तास असा सेवा कालावधी मर्यादित ठेवावा, कालबद्ध पदाेन्नती सरळसेवेने येणाऱ्या वेतनातील तफावत दूर करणे, अशा मागण्या करण्यात अाल्या. संघटनेच्या अध्यक्षा शाेभा खैरनार, बी. जी. माेरे, विजया गरूड, अार. जी. शिंदे, मीना बागुल, उज्ज्वला साळवे, शकुंतला गांगुर्डे, स्मिता शेख, जे. एम. गवळी अादी संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित हाेत्या.