आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा क्रिकेट संघटनेसाठी निवडणूक चिन्हांचे वाटप, १८ जागांसाठी रंगणार लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या त्रैवार्षिक नविडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना नविडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हांचे वाटप केले. त्यात सत्ताधारी खेळाडू पॅनलच्या उमेदवारांना ‘रोडरोलर’ तर विरोधी परविर्तन गटाच्या १७ उमेदवारांना ‘बॅट्समन’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

या नविडणुकीत एकूण १८ जागांसाठी लढत रंगणार आहेत. त्यात अध्यक्ष आणि सेक्रेटरी प्रत्येकी १, सहसेक्रेटरी २, खजिनदार १, कार्यकारिणी सदस्य १० आणि नविड समिती सदस्य अशा पदांसाठी ही नविडणूक रंगणार आहे. त्यासाठीच्या लढतींचे अंतिम चित्र शुक्रवारीच स्पष्ट झाले आहे. आता ३६ उमेदवार नविडणूक रिंगणात असून, त्यातील १८ उमेदवार सत्ताधारी खेळाडू पॅनलचे, तर १७ उमेदवार मकरंद देव यांच्या परविर्तन पॅनलतर्फे उभे करण्यात आले असून, एक उमेदवार स्वतंत्र उभा आहे.

घड्याळ चिन्ह केवळ भिंतीवरचे
नविडणुकीतएकमेव स्वतंत्र उभे राहिलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी महेश भामरे यांनी मागितल्यानुसार त्यांच्याच पक्षाचे चिन्ह घड्याळ देण्यात आले आहे. फक्त हे घड्याळ भिंतीवरचे असल्याने घड्याळ काही सोडले नाही, अशीच चर्चा चिन्ह वाटपानंतर रंगली होती.

दोन हजारांवर मतदार
जिल्हाक्रिकेट संघटनेचे २०५६ इतके सभासद तर ७२ जण क्लब सदस्य आहेत. त्यामुळे ही संख्या २१२८ इतकी होते. त्यामुळे आता दोन्ही पॅनलच्या वतीने ३० जुलैपर्यंत प्रचाराला वेग दिला जाणार आहे. ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी या वेळेत तिडके कॉलनीतील तुपसाखरे लाॅन्स होणार असल्याची माहिती नविडणूक निर्णय अधिकारी अॅड. मनीष लोणारी यांनी दिली.