आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडू पॅनलचे निर्विवाद वर्चस्व, सर्व जागांवर विजय, परिवर्तन पॅनलचा धुव्वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजय प्राप्त केलेल्या खेळाडू पॅनलचे उमेदवार विजयाची खूण करून अानंद व्यक्त करताना. - Divya Marathi
विजय प्राप्त केलेल्या खेळाडू पॅनलचे उमेदवार विजयाची खूण करून अानंद व्यक्त करताना.
नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असाेसिएशनच्या सन २०१५-१८ या त्रैवार्षिक निवडणुकीत असाेसिएशनचे विद्यमान चेअरमन धनपाल शहा यांच्या नेतृत्वाखालील खेळाडू पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर निर्विवाद विजय संपादित करत मकरंद अाेक यांच्या परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला. शनिवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात अाला.
जिल्हा क्रिकेट असाेसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी तुपसाखरे लाॅन्स येथे शनिवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी पर्यंत मतदान घेण्यात अाले. या वेळी २०५६ अाजीव सभासद ७३ क्लब मेंबर्सपैकी १२८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता. विद्यमान चेअरमन धनपाल शहा यांच्या खेळाडू पॅनल मकरंद ओक यांच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांमध्ये समाेरासमाेर लढत झाली. सायंकाळी वाजता त्याच ठिकाणी मतमाेजणीस सुरुवात करण्यात अाली हाेती. या निवडणुकीत खेळाडू पॅनलने सर्वच जागा जिंकून प्रतिस्पर्धी पॅनलचा धुव्वा उडवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. मनीष लाेणारी यांनी कामकाज बघितले.