आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा रुग्णालयाला बाधा अस्वच्छतेची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कंत्राटी आणि शासकीय कर्मचा-यांमध्ये असलेल्या वादामुळे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणा-या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आरोग्यालाच बाधा झाली आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून बंद असून, परिसरातही अस्वच्छता पसरली आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. येथील स्वच्छतागृहदेखील बंद आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृह सोयीचे होते. मात्र, त्यातच अस्वच्छता पसरल्याने आता परिसराचाच वापर केला जातो आहे. बाह्यरुग्ण विभागातील स्वच्छतागृहेदेखील बंद असल्याने रुग्णांसह दैनंदिन तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णालयाच्या स्वच्छतेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच कंत्राटी कामगारांकडून स्वच्छतेची कामे केली जातात. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचारी संघटनेचा विरोध असल्याने कंत्राटी कामगारांकडूनच वॉर्डाची कामे केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वादात रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आले आहे. प्रधान सचिवांच्या दौऱ्यासाठी रुग्णालयाची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती "जैसे थे'च आहे. या दुरवस्थेकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज रुग्णांकडून व्यक्त होत आहे.
तत्काळ पाहणी करतो
आरोग्यसेवेच्या कामात व्यस्त असल्याने अन्य कामांकडे दुर्लक्ष होत आहे. अस्वच्छता होत असल्यास तत्काळ पाहणी करून स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात येतील. डॉ.एकनाथ माले, जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात पडलेल्या साहित्याची अशी धूळधाण झालीय. तसेच, बाजूला उघड्यावर कचरा टाकून, तो तेथेच जाळण्याची कामेदेखील काही कर्मचारी करतात.
वेळेवर स्वच्छता हवी
प्रधानसचिवांचा दौरा झाला तेव्हा रुग्णालयातील जुन्या गाद्या, कपाटे, कॉट इतर वस्तू येथेच ठेवण्यात आल्या होत्या. त्यांची लगेचच िवल्हेवाट लावण्याकडे वरिष्ठांकडून कानाडोळा झाल्याचे निदर्शनास येत आहे.
खराब साहित्यांना दर्प
खराबगादी, कॉट याच परिसरात टाकलेले आहेत. तेथे उंदीर, घुशी, कुत्र्यांचा वावर आहे. परिणामी तेथून उग्र दर्प येत असल्याने रुग्णांसह परिचारिका महाविद्यालयातील परिचारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कंत्राटी शासकीय कर्मचाऱ्यांचा वाद
जिल्हारुग्णालयात स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचारी आहेत. शासकीय सफाई कर्मचाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांवर रुबाब केला जातो. या दोघांतील वादात स्वच्छतेची कामे होत नसल्याने वॉर्डासह परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे.