आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या रेकॉर्डवर डेंग्यूचा एकही बळी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातगुरुवारी डेंग्यूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा खासगी रुग्णालयांनी केला असताना महापालिकेने मात्र जिल्हा रुग्णालयातील (सिव्हिल) राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीनंतरच मृत्यू झालेले रुग्ण डेंग्यूबाधित होते की नव्हते, हे निष्पन्न होईल अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात डेंग्यूचा एकही बळी झाल्याची नोंद पालिकेच्या रेकॉर्डवर नसल्याने सरकारी यंत्रणेच्या बारभाई कारभाराचा नमुना पुढे आला आहे.
गुरुवारी दोन रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणेची बैठक घेतली. यात सादर केलेल्या अहवालात डेंग्यूमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान,ऑक्टोबरमध्ये डेंग्यू बाधितांचा आकडा 122 पर्यंत पोहचला असून, नोव्हेंबरमध्ये 10 रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. नोव्हेंबरमध्ये 58 डेंग्यूचे संशयित आढळले. अद्याप ऑक्‍टोंबर मधील 25 रुग्णांच्या नमुने तपासणीसाठी प्रलंबित असल्याने रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सिव्हिलला देणार मोफत रक्त, प्लेटलेट
शहरातप्लेटलेट रक्ताचा तुटवडा असल्याची तक्रार फरांदे यांनी केल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांनी सिव्हिलमध्ये डेंग्यूवर माेफत उपचार, रक्त प्लेटलेट पुरवले जातील, असे आश्वासन दिले.
चार महिन्यांत 42 घरांचीच तपासणी
गृहभेटीद्वारेडेंग्यू तसेच साथरोगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, असा दावा करणा-या आरोग्‍य विभागाचे पितळ स्वत:च्याच आकडेवारीवरून उघड झाले आहे. जुलै ते ऑक्‍टोबर या चार महिन्यांच्या काळात 42 हजार 100 घरांनाच पथकाने भेटी दिल्या. निव्वळ घरपट्टीच्या रेकॉर्डवर साडेतीन लाख घरे असून, अशा परिस्थितीत 20 टक्केच सर्वेक्षण झाल्याचे स्पष्ट होते.