आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्‍हा रुग्णालयातील व्हीआयपी सूट कुलपात, प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्पुरते राहण्यासाठी असलेला व्हीआयपी सूट कुलूपबंद असल्याने येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांसह इतर प्रशिक्षणार्थींची परवड होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय निवासस्थानात राहण्यास गेल्यापासून हा सूट बंद असल्याचे सांगण्यात येत असून, या निवासस्थानाचा मोह शल्यचिकित्सकांना सुटत नसल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील सूटमध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाची सुविधा आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या परिचारिकांना येथे प्रशिक्षण देण्यात येते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांबाबत कार्यशाळाही चालविली जाते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले पदभार स्वीकारल्यापासून येथेच वास्तव्यास होते. आठ दिवसांपूर्वी डॉ. माले शासकीय बंगल्यात राहण्यास गेले आहेत. तेव्हापासून हा सूट बंद आहे. येथील काही साहित्यदेखील काढून नेण्यात आले आहे. व्हीआयपी कॉटेजला कुलूप लावण्यात आले असल्याने येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांना इतरत्र राहणे भाग पडत आहे. स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने आठ दिवसांपासून प्रशिक्षण वर्गदेखील बंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

या निवासस्थानाचा मोह शल्यचिकित्सकांना सुटत नसल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात आहे. दरम्यान, सध्या प्रशिक्षण नसल्याने तो बंद असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. कोणाही अधिकारी िकंवा मंत्र्यांना अथवा इतर कुणालाही सूट हवा असल्यास संबंधित कर्मचाऱ्याकडे चावी देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सूटमध्ये अशी आहे व्यवस्था
*बैठकीसाठीक्प्रशस्त हॉल
* अधिकाऱ्यांसाठी वातानुकूिलत निवास व्यवस्था
* मेडिकल रेकॉर्ड विभाग
* कर्मचाऱ्यांसाठी वेटींग रूम

प्रशिक्षण नसल्याने सूट बंद
-सध्याप्रशिक्षण नसल्याने हा सूट बंद आहे. केंद्राच्या कर्मचाऱ्याकडे चावी दिलेली आहे. कोणी अधिकारी आल्यास हा सूट तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक